Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होण्याचा अंदाज आहे. BCCI ने अजूनही या ऑक्शनसाठीच्या नियमांची घोषणा केलेली नाही. फ्रँचायझींना किमान ६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवागनी देण्याचा अंदाज आहे. अशात १० फ्रँचायझींमधून बरेच खेळाडू संघाबाहेर होण्याचा अंदाज आहे आणि त्यापैकी कोणत्या खेळाडूंना आपलेसे करता येईल अशी रणनीती प्रत्येक संघाने तयार केली आहे. Mumbai Indians मागे कसे राहतील...
पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. Hardik Pandya च्या नेतृत्वाखाली MI ला यश न आल्याने आगामी आयपीएलमध्ये मुसंडी मारण्यासाठी फ्रँचायझी सज्ज आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स अन्य फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना रिलीज करते, याकडे लक्ष ठेवून आहे. यावेळी MI अष्टपैलू खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांना संतुलित संघासाठी एक तगडा अष्टपैलू आवश्यक आहे. त्यांच्याकडे हार्दिक पांड्या व तिलक वर्मा हे अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु ते मागील पर्वात चमकले नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स नक्कीच चांगल्या ऑल राऊंडरच्या शोधात असतील...
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ग्लेन मॅक्सवेलला रिटेन करण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे. त्याने मागील पर्वात खूपच निराशाजनक कामगिरी केली होती आणि अशात जर RCB ने त्याला रिलीज केले, तर MI नक्कीच ऑसी खेळाडूसाठी बोली लावू शकते.
न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने पुरेशी संधी दिलेली नाही, परंतु त्याच्यात प्रचंड क्षमता आहे, हे सर्वांना माहित्येय... त्यामुळे जर पाचवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिलीज केल्यास मुंबई इंडियन्ससमोर आणखी एक पर्याय असेल. त्याच्यासाठी MI नक्की मोठी रक्कम मोजेल.
गुजरात टायटन्स अफगाणिस्ताच्या अष्टपैलू खेळाडूला रिलीज करतील का? हा प्रश्न आहे. त्याची फिरकी गोलंदाजी आणि मॅच फिनिशरची भूमिका कोणत्याही संघासाठी महत्त्वाची आहे. GT ने त्याला रिलीज केल्यास मुंबई इंडियन्स राशिदला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी नक्की जोर लावेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.