जुनं ते सोनं! Mumbai Indians ची धाव तीनवेळा IPL जेतेपद जिंकून देणाऱ्या कोचकडे; फ्रँचायझीने घेतला मोठा निर्णय

Mumbai Indians Head Coach: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ पूर्वी तीन वेळ संघाला विजेतेपद जिंकून देणाऱ्या प्रशिक्षकाकडे पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे.
Mumbai Indians Head Coach
Mahela Jayawardene | Mumbai Indians | IPLSakal
Updated on

Mahela Jayawardene Head Coach of Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने रविवारी (१३ ऑक्टोबर) मोठी घोषणा केली आहे. मुंबईने माहेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षक म्हणून फेरनियुक्ती केली आहे.

जयवर्धनेने यापूर्वी २०१७ ते २०२२ दरम्यान मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

जयवर्धने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सशी जोडलेला आहे. त्याने २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक (Head of Cricket) म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे जगभरातील विविध लीगमधील संघांची जबाबदारी सांभाळत होता.

Mumbai Indians Head Coach
Mumbai Indians फ्रँचायझीच्या संघात Wild Card एन्ट्री; कोण आहे Corbin Bosch?

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या जगभरात एमआय एमीरेट्स, एमआय केपटाऊन, एमआय न्यूयॉर्क या सिस्टर फ्रँचायझी आहेत. या सर्व संघांच्या प्रशिक्षकांचा प्रमुख म्हणून आणि संघांच्या महत्त्वाचे निर्णय घेण्यात जयवर्धने महत्त्वाची भूमिका बजावत होता.

आता त्याच्याकडे पुन्हा एकदा आयपीएल २०२५ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, जयवर्धनेने ही जबाबदारी पुन्हा स्वीकारल्याने मार्क बाऊचर यांचे मुंबई इंडियन्सबरोबरचे मार्ग वेगळे झाले आहेत. बाऊचर यांनी २०२३ आणि २०२४ या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

या निर्णयाबद्दल मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी म्हणाले, 'माहेला जयवर्धनेला पुन्हा मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करताना आनंद होत आहे. आमच्या जगभरातील इतर संघांना त्यांचे मार्ग आता सापडल्याने माहेलाला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परत आणण्याची संधी निर्माण झाली. त्याचे नेतृत्व, ज्ञान आणि खेळाबद्दलची आवड याचा मुंबई इंडियन्सला नेहमीच फायदा झाला आहे.'

Mumbai Indians Head Coach
Mumbai Indians संघात द्रविडच्या खास माणसाला मिळणार 'जॉब'? पण मग मलिंगा...

याबरोबरच आकाश अंबानी यांनी मार्क बाऊचर यांचेही आभार मानले. तसेच त्यांचे कौशल्य आणि समर्पण महत्त्वाचे होते असं म्हटले असून ते या संघाचा आता अविभाज्य भाग बनल्याच्याही भावना त्यांनी व्यक्त केल्या.

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज असलेल्या जयवर्धनेने देखील या फेरनियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच एक चांगला संघ तयार करून सर्वोत्तम क्रिकेट खेळवण्यावर भर असल्याचे सांगताना तो म्हणाला, पुढील आव्हानासाठी सज्ज आहे.

दरम्यान, आयपीएल २०२५ आधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे सर्वच फ्रँचायझी त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. त्यामुळे जयवर्धनेची फेरनियुक्तीही या लिलावाच्या दृष्टीने मुंबईसाठी महत्त्वाची ठरू शकते. या लिलावापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला ६ खेळाडूंना संघात कायम करता येणार आहे. हा लिलाव नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.