Rohit Sharma ची पळापळ! Mumbai Indians च्या ग्राऊंडवर सरावासाठी गेला होता, पण... Video Viral

Rohit Sharma IND vs NZ: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आगामी न्यूझीलंड मालिकेची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईतील मुंबई इंडियन्सच्या ग्राऊंडवर तो सरावासाठी गेला होता, परंतु तेथे त्याची पळापळ झाल्याचा व्हिडीओ पाहायला मिळतोय... नेमकं असं काय घडलं?
Rohit Sharma
Rohit Sharmaesakal
Updated on

Rohit Sharma Viral Video : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कुटुंबियांसोबत ट्रिपला गेला होता. आता तो मुंबईत परतला आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी त्याने सरावाला सुरुवात केली आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी रोहित सराव करायला नवी मुंबईतील मुंबई इंडियन्सच्या ग्राऊंडवर गेला होता. पण, तिथे त्याची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले..

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकल्यानंतर टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तालिकेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. पण, WTC मध्ये अजूनही भारतीय संघाला न्यूझीलंड ( ३ कसोटी) व ऑस्ट्रेलिया ( ५ कसोटी) यांच्याविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवून फायनलमधील जागा पक्की करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळेच रोहित सरावाला लागला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहितला टीम इंडियाला आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकून द्यायची आहे.

Rohit Sharma
Women’s T20I World Cup Semi Final Scenario: न्यूझीलंडचा पराभव, टीम इंडियाला मिळाला आधार! ऑस्ट्रेलियाचे मानायला हवे आभार

रोहितने सरावाला सुरूवात केली आणि त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यानेही काही चाहत्यांसोबत सेल्फी काढली, परंतु गर्दी आणखी वाढलेली पाहून रोहित पळताना दिसला. तो पळत त्याच्या गाडीत जाऊन बसला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, BCCI ने आयपीएल २०२५  साठी संघात सहा खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी फ्रँचायझींना दिली आहे. मुंबई इंडियन्स रोहितला आपल्या संघात कायम राखण्यासाठी उत्सुक आहेत, पंरतु हिटमॅनची इच्छा नसल्याचे वृत्त समोर येत आहे. अशा परिस्थिती रोहितचे मुंबई इंडियन्सच्या ग्राऊंड्सवर सरावाला जाणे हे तो MI सोबतच राहणार असल्याचे संकेत आहेत. पण, हार्दिक पांड्याला पुन्हा कर्णधारपदी कायम राखल्यास फ्रँचायझीला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत फ्रँचायझी व रोहित काय तोडगा शोधतात याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.