Mumbai Indians चा खास माणूस LSG ने फोडला: Zaheer Khan आयपीएल २०२५ मध्ये मेंटॉरच्या भूमिकेत

IPL 2025 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठीच्या हालचालींनी वेग पकडला आहे. १० फ्रँचायझींना किती खेळाडूंना कायम राखता येईल, याची सप्टेंबरमध्ये घोषणा होईल.
zaheer khan
zaheer khanesakal
Updated on

Zaheer Khan IPL 2025 LSG : माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान हा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) ला मार्गदर्शन करणारा आहे. झहीर यापूर्वी मुंबई इंडियन्सचा ग्लोबल डेव्हलपमेंट टीमचा प्रमुख होता. आता तो LSG मध्ये दिसणार आहे. LSG चे मालक संजीव गोएंका यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. झहीरकडे गोलंदाजी प्रशिक्षकाचीही जबाबदारी असणार आहे.

''LSGने आयपीएलच्या मागील ३ पर्वात दोनवेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि या संघाचा मी गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. हा एक खास प्रवास असेल. मी या शहरात बरेच सामने खेळलो आहे, बराच वेळ घालवला आहे. लवकरात लवकर मी या शहरात पोहोचेन,”असे झहीर खान म्हणाला.

४५ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज ९२ कसोटी, २०० वन डे आणि १८ ट्वेंटी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या नावावर ६१० आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. LSG मध्ये त्याच्याकडे मेंटॉरशिपच नव्हे तर गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारीही असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()