Ranji Trophy 2024 : मुंबईला फटका बसला; त्रिपुराने विजयापासून रोखले, आता बाद फेरीत प्रवेशाचे वांदे झाले

Mumbai vs Tripura Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील त्रिपुराविरूद्धचा मुंबईचा तिसरा सामना अनिर्णित राहीला आहे.
mumbai vs Tripura
mumbai vs Tripuraesakal
Updated on

Mumbai vs Tripura Ranji Trophy 2024-25: रणजी ट्र्रॉफी स्पर्धेतील मुंबईचा त्रिपुराविरूद्धचा तिसरा सामना अनिर्णित राहिला. पण, मुंबईला पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे मुंबईला ३ गुण मिळाले व त्रिपुराला एका गुणावर समाधान मानावे लागले. मुंबई संघ ९ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे व त्रिपुरा ९ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबईला बाद फेरीमध्ये पोहचण्यासाठी उर्वरीत ४ सामने जिंकावे लागतील व इतर संघांच्या कामगिरीवर मुंबईचे बाद फेरीचे समीकरण अवलंबून आहे.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्रिपुरानेही कडवी झुंझ दिली, तरीही मुंबईकडे आघाडी होती. मुंबईने चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात २७१ धावांची आघाडी असताना डाव जाहीर केला. पुढे त्रिपुरा ४८ धावांवर खेळत असताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला आणि सामना ड्रॉ जाहीर करण्यात आला.

point table
point tableesakal

मुंबईने पहिल्या डावात ४५० धावा केल्या. सुरूवातील ४ बाद ८७ अशी मुंबईची परिस्थिती होती. पण, ज्यामध्ये सुर्यांश शेडगेने ९९ धावांची खेळी केली. शम्स मुलानी (७१), हिमांशु सिंग (५९) व शार्दुल ठाकूर (६२) यांनी अर्धशतकी खेळी केली. या खेळींच्या जोरावर मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.

mumbai vs Tripura
20 Balls 94 runs ! Rajat Patidar ने वेगवान शतक झळकावले, IPL 2025 Auction पूर्वी RCB चे टेंशन वाढवले

त्रिपुरानेही जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सालामीवीर जीवनजोत सिंगने १५ चौकारांसह ११८ धावांची शतकी खेळी केली. तर, श्रीदम पौलने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली व मनदीप सिंग ६२ धावांवर नाबाद राहीला. त्रिपुराने पहिल्या डावात ३०२ धावा उभारल्या व मुंबईने १४८ धावांची आघाडी घेतली.

मुंबईने दुसऱ्या डावाची सुरूवात खराब केली. अवघ्या ४४ धावांवर मुंबईचे आघाडीचे ५ फलंदाज माघारी परतले होते. पुढे कर्णधार अजिंक्य रहाणे व सिद्धेश लाडने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण १०८ धावांवर सिद्धेशच्या रुपाने मुंबईला सहावा धक्का मिळाला. चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात ६ बाद १२३ अशी धावसंख्या असताना व २७१ धावांची आघाडी असताना मुंबईने त्रिपुराला फलंदाजीसाठी बोलावले.

mumbai vs Tripura
Ranji Trophy 2024: मुंबईचा दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न; हिमांशूची फलंदाजीपोठापाठ गोलंदाजीतही चमक

त्रिपुराने दिवस समाप्तीपर्यंत बिन बाद ४८ धावा केल्या व ४ दिवसांचा खेळ संपल्यामुळे सामना अनिर्णित राहीला. मुंबईचा पुढचा सामना ६ नोव्हेंबरपासून ओडिसाविरूद्ध होईल. तर, त्रिपुरा बडोद्याविरूद्ध पुढचा सामना खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.