Ranji Trophy 2024: मुंबई संघाला सावरण्यात यश आले, पण शतक पुर्ण करण्यात अपयशी ठरला Suryansh Shedge

Mumbai vs Tripura Ranji Trophy 2024: मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्रिपुराविरूद्ध पहिल्या दिवशी ६ विकेट्स गमावत २४८ धावा उभारल्या आहेत.
Suryansh Shedge
Suryansh Shedgeesakal
Updated on

Mumbai vs Tripura Ranji Trophy 2024: गतविजेता मुंबई संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना त्रिपुराविरूद्ध खेळत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईला बडोद्याविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, महाराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला. आजच्या त्रिपुराविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई पहिल्या दिवसात चांगली कामगीरी केली आणि दिवसाअंती २४८ धावांचा टप्पा गाठला. ज्यामध्ये सुर्यांश शेडगेचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.

मुंबईने सामन्याची सुरूवात जरी संथ गतीने केली, तरी नंतर सामन्यात वेग पकडला. मागच्या सामन्यात दीडशतकी खेळी करणारा आयुष म्हात्रे दुसऱ्या षटकात ४ धावा करून परतला. त्यामागोमाग सिध्दांत अधटरावही (५) तंबुत परतला. पुढे कर्णधार अजिंक्य रहाणे व पृथ्वी श्वॉच्या जागी संघात खेळणाऱ्या अंग्रीश रघुवंशीने मैदानवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना संघाचे अर्धशतक पुर्ण केले.

Suryansh Shedge
IND vs NZ Test: ४३३१ दिवस, १२ वर्षे अन् १८ मालिका... अखेर टीम इंडिया मायदेशात हरले! एकदा आकडेवारी पाहाच

२४ व्या शटकात अंग्रीश रघुवंशी (२८) पायचीत झाला, तर ३० व्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे (३५) धावबाद झाला. ८७ वर ४ बाद अशी मुंबईची अवस्था असताना मुंबईचा डाव घसरेल असे वाटले होते. पण सिद्धेश लाड व सुर्यांश शेडगेच्या जोडीने सामन्यात लय पकडली. दोघांनी ७० धावांची भागिदारी केली. मुंबईच्या धावसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना. सिद्धेश लाड २९ धावांवर झेलबाद झाला.

सिद्धेश बाद झाल्यानंतर मुंबईच्या खेळीला ब्रेक लागला नाही. सुर्यांशने शम्स मुलानीला साथीला घेतले आणि पुन्हा भागीदारी उभारली. मुंबईची धावसंख्या २०० पार घेऊन जाण्यात या जोडीला यश आले. पण, तिसऱ्या सामन्यात संधी मिळालेल्या सुर्यांश शेडगेचे शतक पुर्ण होण्यासाठी एका धावेची गरज असताना त्याला झेलबाद होऊन माघारी परतावे लागले. सुर्यांशने संघाला सावरताना स्पोटक खेळी केली. त्याने १० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ९३ चेंडूत ९९ धावांचे योगदान दिले. सध्या शम्स मुलानी ३८ व हिंमाशु सिंग ५ धावांवर नाबाद आहेत आणि मुंबईने दिवसाअखेरीस ६ विकेट्स गमावत २४८ धावांचा टप्पा गाठला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.