Ranji Trophy Final रोमांचक वळणावर, शेवटच्या दिवशी विदर्भाला 290 धावा तर मुंबईला 5 विकेटचे समीकरण

Ranji Trophy 2024 Final Mumbai vs Vidarbha News : कोण जिंकणार रणजी ट्रॉफी? मुंबईच्या विजेतेपदाची प्रतीक्षा लांबली! विदर्भचा जोरदार प्रतिकार
Ranji Trophy 2024 Final Mumbai vs Vidarbha Latest News Marathi
Ranji Trophy 2024 Final Mumbai vs Vidarbha Latest News Marathi
Updated on

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy 2024 Final News : रणजी विजेतेदाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुंबई संघाला आहे तेथेच ठेवण्याचा झुंझार खेळ विदर्भने चौथ्या दिवशी केला. त्यामुळे निकाल आता उद्या अंतिम दिवशी लागणार आहे. मुंबईला पाच विकेटची तर विदर्भला २९० धावांची गरज आहे.

विदर्भसाठी हे आव्हान कठीण असले तरी अशक्य नाही मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईसाठी आजही प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार हे निश्चित आहे. एकूणच रणजी विजेतेपदाच्या सामन्याची ही रंग वाढली आहे. कर्णधार अक्षय वाडकर एका बाजूने लढा देत असून तो ५६ धावांवर नाबाद आहे.

Ranji Trophy 2024 Final Mumbai vs Vidarbha Latest News Marathi
WPL 2024 : 5 षटकार... 7 चौकार... शेफाली वर्माची तुफानी खेळी अन् दिल्लीचा संघ थेट दुसऱ्यांदा फायनलमध्ये!

पहिल्या डावात अवघ्या १०५ धावांत धुव्वा उडालेल्या विदर्भने विजयासाठी ५१९ धावांचे आव्हान असले तरी धैर्य खचू दिले नाही. आव्हान कितीही असले तरी आम्ही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, असे काल पाच विकेट मिळवणारा त्यांचा हर्ष दुबे म्हणाला होता. आज त्यांनी ही जिगर दाखवली.

आज चौथ्या दिवशी किल्ला लढवायचा आणि आज अंतिम दिवशी जेवढे आव्हान असेल त्याचा विचार करायचा, असे धोरण विदर्भच्या फलंदाजांनी आखले होते. त्यानुसार खेळ करत दिवस भरात २३८ धावा करताना पाचच विकेट गमावल्या.

विचार सावध फलंदाजीचा असला तरी विदर्भचे सलामीवीर अर्थव तायडे आणि ध्रुव शौरे यांनी आक्रमक सुरुवात केली. धवल कुलकर्णी-शार्दुल ठाकूर- तुषार देशपांडे या वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्यांनी धावांचा वेग वाढवत १८.४ षटकांत ६४ धावांची सलामी दिली, त्यावेळी मुंबईच्या गोटातही चिंता निर्माण झाली होती; परंतु शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी सलग दोन चेंडूवर या दोघांना बाद केले आणि विदर्भची अवस्था दोन बाद ६४ अशी केली.

Ranji Trophy 2024 Final Mumbai vs Vidarbha Latest News Marathi
Rishabh Pant: तब्बल 14 महिन्यांनी IPL मधून कमबॅक करणारा पंत म्हणतोय, 'खरंच चमत्कार घडला, आता...'

सलग दोन विकेट गमावल्यामुळे अमन मोखाडे आणि करुण नायर यांनी जणू काही नांगरच टाकला होता. फारच अधिक प्रमाणात त्यांनी संथ फलंदाजी केली कोणत्याही परिस्थितीत मुंबईला विकेट द्यायची नाही, असा त्यांचा हेतू होता, त्यामुळे दुसऱ्या सत्रात ३६ षटकांत केवळ ९४ धावाच करता आल्या.

करुण नायरला जीवदान

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणाऱ्या करुण नायरने ७४ धावांची खेळी केली, त्यासाठी त्याने तब्बल २२० चेंडू घेतले. तो चार धावांवर असताना यष्टीरक्षक तामोरेने त्याचा सोपा झेल सोडला नसता तर मुंबईला आजच विजयाची मोहर उमटवता आली असती.

१८३ चेंडूनंतर चौकार

करुण नायर एवढा संथ फलंदाजी करत होता की विदर्भला १८३ चेंडूंत एकही चौकार मारता आला नाही. मोखाडे बाद झाल्यावर मैदानात आलेल्या कर्णधार अक्षय वाडकरने दोन चौकार मारत डावाला गती दिली. त्याच्या चपळतेमुळे नायरनेही वेग वाढवण्याचा प्रयत्न केला.

मुशीर गोलंदाजीतही प्रभावी

करुण नायर-मोखाडे आणि नायर-वाडकर या विदर्भच्या जमलेल्या जोड्या मुशीर खानने फोडल्या. प्रथम त्याने मोखाडेला आणि नंतर नायरला बाद केले.

कसे आहे समीकरण

- अंतिम दिवशी किमान ९० षटकांत विदर्भला हव्यात २९० धावा

- मुंबईला गरज पाच विकेट मिळवण्याची

असा झाला चार दिवसांचा खेळ

अंतिम दिवशी विदर्भला विजयासाठी ९० षटकांत २९० धावांची गरज आहे, त्यामुळे पहिल्या चार दिवसांत झालेल्या खेळाचा आढावा

  • पहिल्या दिवशी : ७७ षटकांत २५५ धावा (१३ विकेट)

  • दुसऱ्या दिवशी : ८२ षटकांत २१५ धावा (९ विकेट)

  • तिसऱ्या दिवशी : ८२ षटकांत २८८ धावा (८ विकेट)

  • चौथ्या दिवशी : ९० षटकांत २३८ धावा (पाच विकेट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.