Ranji Trophy : अखेर 8 वर्षांचा दुष्काळ संपला! मुंबईने विदर्भाचा पराभव करून 42व्यांदा बनली रणजी चॅम्पियन

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : अखेर मुंबईने 8 वर्षांचा दुष्काळ संपला, रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. आणि विजेतेपद पटकावले आहे.
Ranji Trophy Final News in Marathi
Ranji Trophy Final News in Marathiेोकोत
Updated on

Ranji Trophy : अखेर मुंबईने 8 वर्षांचा दुष्काळ संपला, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ 2024 च्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाचा पराभव करून 42 व्यांदा चॅम्पियन बनला. यापूर्वी ती 2015-16 मध्ये चॅम्पियन बनली होती. मुंबईचा संघ 48 व्यांदा रणजी फायनलमध्ये पोहोचला होता. तर विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या डावात 105 धावांत गुंडाळल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावात जबरदस्त झुंज दाखवली.

Ranji Trophy Final News in Marathi
Team India : मालिकेनंतर मोठा खुलासा! रोहित-द्रविड नाही... तर 'या' दिग्गजांमुळे युवा खेळाडूंना मिळाली संधी

या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व दिसून आले. विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला 538 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली परंतु केवळ 368 धावांपर्यंतच मजल मारता आली.

अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 गडी गमावून 248 धावा केल्या होत्या. यानंतर संघाला कर्णधार अक्षर वाडकरकडून मॅचविनिंग इनिंगची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात विदर्भ संघाने एकही गडी गमावला नाही, मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई संघाने दमदार पुनरागमन करताना प्रथम अक्षय वाडकरला वैयक्तिक 102 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आणि हर्ष दुबेलाही 65 च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले.

त्यानंतर मुंबईने विजयाच्या दिशेने पावले टाकले. येथून विदर्भाचा डाव गडगडण्यास जास्त वेळ लागला नाही आणि संपूर्ण संघ 368 धावांवर आटोपला. मुंबईकडून या डावात तनुष कोटियनने 4 तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने 2-2 बळी घेतले. शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळविले.

Ranji Trophy Final News in Marathi
IPL 2024 : 'मी तर त्या खेळाडूला उपकर्णधार बनवलं असतं...' रोहित-हार्दिक कर्णधारपदाच्या वादावर युवीचे धडाकेबाज विधान

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली या रणजी मोसमात मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यात त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. एकात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर बडोदाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अनिर्णित राहिला तेव्हा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला. जिथे त्यांनी तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

मुंबईसाठी या रणजी मोसमात सर्वाधिक धावा भूपेन लालवानीच्या बॅटतून आल्या, ज्याने 10 सामन्यांत 39.2 च्या सरासरीने 588 धावा केल्या. मोहित अवस्थीने संघाकडून सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने 8 सामन्यात 35 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.