Musheer Khan inches closer to India team: मुंबईचा १९ वर्षीय फलंदाज मुशीर खान याने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारत अ संघाविरुद्ध दमदार खेळीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. पण, आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २०२२ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण ते १९ वर्षांखालल वर्ल्ड कप या स्पर्धेत मुशीरने आपली योग्यता सिद्ध केली. मुशीर त्याचा भाऊ सर्फराज खान याच्याप्रमाणेच लवकरच भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यासाठी BCCI ने भारी प्लान आखला आहे.
भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पण, त्याआधी नोव्हेंबरमध्ये भारत अ संघ ऑस्ट्रेलियात रवाना होईल आणि त्या संघात मुशीर खानचा समावेश होणार आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये मुशीरचा समावेश करून निवड समितीने त्याच्यावर लक्ष आहे, हे दाखवून दिले. अजित आगरकरच्या निवड समितीला युवा खेळाडूकडून अपेक्षा आहे आणि त्यामुळेच त्याला अधिकाधिक संधी मिळाली, असा त्यांचा प्रयत्न आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघाची निवड ही दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषक या दोन्ही स्पर्धांतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. या दोन्ही स्पर्धांमध्ये मुशीर खान खेळणार आहे. त्यानु दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात १८१ धावांची खेळी करून दाखवली आहे. मुशीरने सात प्रथम श्रेणी सामन्यांत तीन शतके आणि सात अर्धशतकांसह मैदान गाजवले आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील त्याचे द्विशतक आणि अंतिम फेरीतील शतक हे विसरून चालणार नाही.
मुशीरचा फॉर्म लक्षात घेता, तो भारताच्या कसोटी संघात आपल्या भावासोबत खेळताना लवकरच दिसू शकतो. गेल्या तीन वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट विक्रम असूनही सर्फराज खानने २०२४ मध्येच भारतासाठी पदार्पण केले. मुशीर खानची अष्टपैलू क्षमता त्याला वरचढ ठरवते. मुशीरने ७ प्रथम श्रेणी सामन्यांत ६४.५४ च्या सरासरीने ७१० धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर ७ विकेट्सही आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.