Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Musheer Khan reacted on His Accident: मुशीर खानचा दोन दिवसांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. या अपघातामुळे त्याला आगामी काही महिने क्रिकेटलाही मुकावे लागणार आहे. या अपघातानंतर त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Musheer Khan and Naushad Khan
Musheer Khan and Naushad KhanSakal
Updated on

मुंबईचा युवा फलंदाज आणि सर्फराज खान याचा धाकटा भाऊ मुशीर खान याचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) गंभीर कार अपघात झाला आहे. या अपघातात त्याला गंभीररित्या दुखापती झाल्या आहेत.

रिपोर्ट्सनुसार तो आणि त्याचे वडील नौशाद हे कारमधून आझमगड येथून लखनौ असा प्रवास करत होते. पण त्यांची गाडी यमुना एक्सप्रेसवे येथे डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात नौशाद यांना फार लागले नाही, मात्र मुशीरच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आता काही महिन्यांसाठी क्रिकेटला मुकावे लागणार आहे.

त्याला इराणी कप आणि रणजी ट्रॉफीमधील सामनेही मुकावे लागणार आहेत. त्याच्या या अपघातामुळे तो लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर आता पहिल्यांदाच मुशीर आणि नौशाद यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Musheer Khan and Naushad Khan
Accident Updates : Musheer Khan च्या गाडीचा भीषण अपघात, मेडिकल रिपोर्ट समोर; पाहा धडकी भरवणारे Photos

इंस्टाग्रामवर त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. नौशाद यांनी म्हटले की 'पहिली गोष्टी मी ईश्वराचे आभार मानतो की त्यांनी हे नवं आयुष्य दिलं. आमच्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे आभार मानतो.'

'मी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांचेही आभार मानतो की ते खूप काळजी घेत आहेत. यापुढे होणाऱ्या अपडेट्स त्यांच्याकडूनच देण्यात येतील. जे आम्हाला मिळालं नाही, त्याबद्दलही आम्ही आभारीच आहोत आता संयम ठेवू. जे आम्हाला मिळालंय, त्यासाठीही आम्ही कृतज्ञ आहोत.'

तसचे मुशीर म्हणाला, 'पहिल्यांदा मी ईश्वराचे आभार मानतो. मी आता ठीक आहे. माझे वडील माझ्यासोबत आहेत आणि ठीक आहेत. मी सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल आभार मानतो.'

Musheer Khan and Naushad Khan
Rishabh Pant Accident : ...तर पायाचा काही भाग काढावा लागला असता; पंतने सांगितलं अपघातानंतर नेमकं काय झालं

मुशीरला आता साधारण १६ आठवड्यांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. याच कारणाने त्याला आगामी काहीदिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागणार आहे.

मुशीर २०२४ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाकडूनही खेळला होता. त्याने भारतासाठी ७ सामन्यात ६० च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या. तोया स्पर्धेत उदय सहारननंतर सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. आत्तापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३ शतकांसह ७१६ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.