Viral video: फास्ट बॉलर ख्रिस वोक्सची 'फिरकी'; नासेर हुसेनला आली 'गिरकी'; खूर्चीवरून जवळपास पडलाच

England vs Sri Lanka Nasser Hussain Viral Video : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटीदरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स हा फिरकी गोलंदाजी करताना दिसला.
nasser hussain
nasser hussainesakal
Updated on

Chris Woakes Spin Viral Video: ओव्हल येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान अपुऱ्या विद्युतप्रकाशामुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला फिरकी गोलंदाजी करावी लागली. अपुऱ्या विद्युतप्रकाशामुळे पंचांनी वेगवान गोलंदाजी करण्यास नकार दिला, ज्यामुळे वोक्सने त्याचे षटक फिरकी गोलंदाजीने पूर्ण केले. वोक्सच्या या अनपेक्षित फिरकी गोलंदाजीने खेळाडू, समालोचक आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणले.

वोक्सने आपल्या वेगवान गोलंदाजीने चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर निसांकाला बाद केले. अपुऱ्या विद्युतप्रकाशामुळे पंचांनी हस्तक्षेप केला आणि उरलेल्या ४ चेंडूंमध्ये फिरकी गोलंदाजी करण्यास सांगितले. वोक्स फिरकी गोलंदाजीने विकेट मिळवण्यात अयशस्वी ठरला, तरीही त्याच्या गोलंदाजीमुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर मजेदार प्रतिक्रिया उमटल्या. वोक्सची गोलंदाजी पाहून जो रूटने देखील आश्चर्याने भुवया उंचावल्या.

nasser hussain
Rishabh Pant बनला खबरी? प्रतिस्पर्धी संघाचे प्लॅन ऐकण्यासाठी त्याच्याच गोटात घुसला, पाहा Video

समालोचकांच्या म्हणण्यानुसार, जो रूटचा वोक्सच्या फिरकी गोलंदाजीवर विश्वास बसत नव्हता आणि बेन स्टोक्सला पूर्णपणे धक्काच बसला होता, झॅक क्रॉली आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन हे समालोचन कक्षातून वोक्सच्या अनपेक्षित गोलंदाजीचा आनंद घेत होते. वोक्सच्या गोलंदाजीवर हसता हसता हुसेन खुर्चीवरून खाली पडला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंग्लंडने सुरूवातीच्या दोन कसोटी सामन्यात एकहाती विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने ३२५ धावा उभारल्या. या डावात ऑली पोपने १५६ चेंडूंमध्ये १५४ धावांची खेळी केली. खेळीदरम्यान त्याने १९ चौकार व २ षटकार ठोकले. तर सलामीवीर बेन डकेटने ७६ चेंडूंमध्ये ८६ धावा बनवल्या.

श्रीलंकेचा पहिला डाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी २६३ धावांमध्ये आटपला. ज्यामध्ये ख्रिस वोक्स २, शोएब बशीर १, तर जोश हुल आणि ओली स्टोन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. तर श्रीलंकन फलंदाज पथुम निसंका(६४), धनंजया डी सिल्वा(६९), कमिंडू मेंडीस(६४) धावा केल्या.

दुसऱ्या डावात इंग्लंडने १५६ धावा करत श्रीलंकेला २१९ धावांचे आव्हान दिले आहे. या डावामधमध्ये श्रीलंकेच्या लहीरु कुमाराला ४, तर विश्वा फरनांडोला ३ विकेट्स मिळाले. इंग्लंडच्या जेमी स्मिथने ६७ धावांची खेळी खेळली.

nasser hussain
RCB ... RCB... जेव्हा आवेश खानची प्रेक्षकांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर उडवली खिल्ला, Video होतोय व्हायरल

तर श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू असून पथुम निसंका ६४ चेंडूंमध्ये ६० धावांवरती खेळत आहे. श्रीलंकेची १२०/२ अशी धावसंख्या झाली असून एका दिवसाचा खेळ शिल्लक असताना श्रीलंकेला जिंकण्यासाठी ९९ धावांची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.