Hardik-Natasa : हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर 'या' गोष्टीमुळे सुरु झाला वाद?

Hardik Pandya Natasa Stankovic parenting : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक भले वेगळे झाले असतील पण अजून एक नातं बाकी आहे ज्याचा निर्णय दोघांना घ्यायचा आहे.
Hardik Pandya Natasa Stankovic parenting
Hardik Pandya Natasa Stankovic parenting sakal
Updated on

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक भले वेगळे झाले असतील पण अजून एक नातं बाकी आहे ज्याचा निर्णय दोघांना घ्यायचा आहे. हार्दिकसोबत घटस्फोटाच्या निर्णयाच्या एक दिवस आधी नताशा आपला मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत तिच्या पोस्ट करत असते, ज्यामध्ये नताशा आपल्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्या सध्या श्रीलंकेत टी-20 मालिका खेळण्याच्या तयारीत व्यस्त आहे.

Hardik Pandya Natasa Stankovic parenting
गंभीरचा पठ्ठ्या बनणार इंग्लिशमन, 2 वर्षांपासून टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्याने घेतला मोठा निर्णय!

हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु आता मुलगा अगस्त्याचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. घटस्फोट म्हणजे काय हे देखील माहीत नसलेल्या चार वर्षाच्या मुलाने कोणासोबत राहणार? या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नताशाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक रहस्यमय पोस्ट केली, ज्यानंतर गोंधळ आणखी वाढला.

हार्दिक आणि नताशामध्ये अडकला मुलगा अगस्त्य?

शुक्रवारी नताशा स्टॅनकोविकने एक पोस्ट केली ज्याची जोरदार चर्चा होत आहे. पालकत्वाचा संदर्भ देत त्यांनी लिहिले, "हे जग कठोर आहे म्हणून तुमच्या मुलांसोबत कठोर वागू नका. याचा अर्थ प्रेम कठोर नाही तर नशीब कठोर आहे. जेव्हा मुले तुमच्या पोटी जन्माला आली तेव्हाच तुम्ही त्यांचे जग बनलाय ही गोष्ट खरी आहे. आणि ते ते तुमचेच आहेत प्रेम करण्यासाठी.....

Hardik Pandya Natasa Stankovic parenting
SL vs IND : गंभीरने टीम इंडियाची प्लेइंग- 11 केली पक्की... कर्णधार सूर्या 'या' 3 खेळाडूंना करणार बाहेर?

नताशाने हार्दिकला केले टार्गेट?

घटस्फोटानंतर नताशा सर्बियामध्ये आपला मुलगा अगस्त्याची चांगली काळजी घेत आहे. पण तिची ही पोस्ट हार्दिक पांड्याला टोमणा म्हणून पाहिली जात आहे. हार्दिकला आपल्या मुलाची काळजी नाही का? अगस्त्याला त्याच्यासोबत राहायचे नाही का? हार्दिकला आता एकटे राहायचे आहे का? नताशाच्या या रहस्यमय पोस्टनंतर हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.

हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्य कोणासोबत आयुष्य घालवणार हा मोठा प्रश्न आहे. पती-पत्नीने वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु दोघेही आपल्या मुलाबाबत पुढे काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.