Rishabh Pant चा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका; कसोटी मालिकेत रोखण्यासाठी आखणार नवी रणनीती

Border-Gavaskar Trophy आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेबाबत बोलताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रिषभ पंतच्या फलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Rishabh pant
Rishabh pantesakal
Updated on

Nathan Lyon praises Rishabh Pant: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंतने शतकीय खेळी केली. ऋषभ पंत नेहमीच आपल्या वेगळ्या अंदाजात फलंदाजी करताना पहायला मिळतो. ऋषभ आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऋषभ पंतच्या फलंदाजीबद्दल ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टेन्शन असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

२२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधी २०२०-२१ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने विजयी खेळी केली व भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर धुळ चारली होती.

Rishabh pant
Rishabh Pant: ना विराट ना रोहित; ऑस्ट्रेलियाला वाटतेय रिषभ पंतची भीती

आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रोहित, विराट नाही तर ऋषभ पंतबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने आणि स्टीव्ह स्मिथने देखील ऋषभची स्तुती केली आहे. रिषभ पंत हा असा खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो असे कमिन्सने रिषभला संबोधले. या यादीत आता नॅथन लायनने देखील नंबर लावला आहे. नॅथन लायनने ऋषभ पंतला 'सर्वगुणसंपन्न' म्हणत स्तुती केली आहे.

नॅथन लायन म्हणाला, "ऋषभ पंत सारख्या कौशल्यसंपन्न खेळाडूविरुद्ध गोलंदाजी करताना मी त्याच्या खेळपट्टीमध्ये गोलंदाजी करून बचाव करण्याचा प्रयत्न करतो. ऋषभ पंतकडे क्रिकेटमधील सर्व कौशल्ये आहेत व तो एक आक्रमक फलंदाज आहे."

"गोलंदाजी करताना तुमची छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. म्हणून आपण सतर्क असणे आवश्यक आहे. फलंदाजी करताना मला षटकार मारण्याची भीती वाटत नाही. परंतु गोलंदाजी करताना ऋषभसारख्या फलंदाजापासून बचाव करण्याचे माझ्यापुढे आव्हान आहे." नॅथन पुढे म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.