Virat Kohli: अमित मिश्रानं विराटवर केलेले LSG खेळाडूंबरोबर भांडणाचे आरोप; पण नवीन-उल-हक म्हणाला, 'गोष्टी आता...'

Naveen-ul-Haq: आयपीएल २०२३ दरम्यान विराट कोहलीचे लखनौ सुपर जायंट्स संघातील खेळाडू नवीन-उल-हकबरोबर वाद झाले होते. याबाबत आता नवीनने प्रतिक्रिया दिली आहे.
Virat Kohli - Naveen-ul-Haq
Virat Kohli - Naveen-ul-HaqSakal
Updated on

Naveen-ul-Haq on his fight with Virat Kohli: भारताचा क्रिकेटपटू अमित मिश्रा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने नुकतेच विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल अशा अनेक खेळाडूंबाबत खळबळजनक भाष्य केले होते.

त्याने युट्युबर शुभांकर मिश्रा यांच्या अनप्लग या पॉडकास्टमध्ये असंही म्हटलं होतं की २०२३ आयपीएलमध्ये विराटने विनाकारण लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू नवीन-उल-हक आणि इतर खेळाडूंबरोबर वाद घातला होता.

खरंतर आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात झालेल्या सामन्यादरम्यान विराटचे नवीन-उल-हकबरोबर मोठे वाद झाले होते, ज्यात त्यावेळी लखनौचा मेंटॉर असणारा गौतम गंभीरही सामील झाला होता. ज्यानंतर त्यांच्यावर बीसीसीआयने दंडात्मक कारवाईही केली होती.

मात्र या घटनेनंतर २०२३ वनडे वर्ल्ड कपवेळी विराट आणि नवीन यांच्यातील भांडण मिटल्याचे दिसले होते, तसेच २०२४ आयपीएलवेळी विराट आणि गंभीरही एकमेकांशी आनंदाने चर्चा करताना दिसले होते.

Virat Kohli - Naveen-ul-Haq
Virat Kohli : 'ज्या चिकूला मी ओळखत होतो तो...' कोहलीवर दिग्गज भारतीय क्रिकेटरची टीका, रोहितबद्दल मात्र...

दरम्यान, आता त्या भांडणाऱ्या घटनेबद्दल नवीनने पुन्हा एकदा मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की त्याची प्रतिक्रिया अमित मिश्राने केलेल्या आरोपांचा विरोधाभास आहे.

नवीन सध्या मेजर लीग क्रिकेट २०२४ स्पर्धा टेक्सास सुपर किंग्सकडून खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान टेक्सास सुपर किंग्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात नवीनला विराटबरोबर झालेल्या भांडणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर नवीन म्हणाला, 'मी मोजले नाही, पण मला खूपवेळा याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. मी यापूर्वीही ह स्पष्ट सांगितलं आहे की ती त्या क्षणी आलेली प्रतिक्रिया होती (HEAT OF THE MOMENT).'

'विराट त्याच्या फ्रँचायझीसाठी खेळत होता आणि मी माझ्या फ्रँचायझीसाठी खेळत होतो. जेव्हा बाब संघाबाबत असते, मग ते देशाचा असो किंवा फ्रँचायझीचा मी माझे सर्वस्व पणाला लावतो. शेवटी आपण सर्वच खेळाडू आहोत.'

Virat Kohli - Naveen-ul-Haq
Virat Kohli Krishna Das kirtan: लंडनमध्ये कीर्तन अन् चर्चा भारतात... रॉकस्टार योगीच्या रंगात रंगले अनुष्का आणि विराट!

नवीन पुढे म्हणाला, 'यातील काहीच वैयक्तिक नव्हते आणि सर्व गोष्टी आता संपल्यात. आजकाल सोशल मिडिया अशी गोष्ट आहे, त्यावर हे तोपर्यंत चालत राहते, जोपर्यंत काही मसाला मिळत नाही. वनडे वर्ल्ड कपवेळीच सर्वकाही संपले होते.'

वनडे वर्ल्ड कपवेळी भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान विराटने प्रेक्षकांना नवीनची हुर्यो न उडवण्याबाबत इशारा केला होता. त्यानंतर हे दोन खेळाडू एकमेकांना भेटले होते, त्याचवेळी त्यांच्यातील भांडण संपल्याचे समोर आले होते.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.