NZ vs AUS Wide Ball Record : कसोटी क्रिकेटमध्ये वाईड बॉल टाकणं हा एकप्रकारे मोठा गुन्हा आहे. कसोटीत वाईड बॉलचे नियम तसे फार कडक नाहीत. वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये लेग साईडला चेंडू थोडा जरी बाहेर जात असला तरी वाईड दिला जातो. मात्र कसोटीत तसं होत नाही. कसोटीत चेंडू खूप लांबून जात असेल तरच तो वाईड बॉल दिला जातो.
मात्र इतके शिथील नियम असूनही न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यात कहर केला.
पहिल्या डावात न्यूझीलंडचे गोलंदाज विलियम ओरूरकेने 11 स्कॉटने 7 तर मॅट हेन्रीने 2 वाईड बॉल टाकले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने तब्बल 20 वाईड बॉल टाकले. त्यात भरीस भर म्हणून 3 नो बॉल देखील टाकले. या 23 अतिरिक्त धावांमुळे कांगारूंचा चांगलाच फायदा झाला.
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 267 धावा अशी केली होती. मात्र शेवटची जोडी कॅमरून ग्रीन आणि जॉश हेजलवूड यांनी कांगारूंना 383 धावांपर्यंत पोहचवले. ग्रीनने 174 धावांची खेळी केली. तर हेजलवूडने 22 धावा जोडल्या. जर वाईड आणि नो बॉलच्या अतिरिक्त धावा कमी केल्या असत्या तर कांगारूंचा पहिला डाव 360 धावांमध्ये आटोपला असता.
पहिल्या डावात तब्बल 20 वाईड बॉल टाकणाऱ्या न्यूझीलंडने एक अप्रिय विक्रम देखील आपल्या नावावर केला. कसोटीच्या पहिल्या डावात सर्वाधिक वाईड बॉल टाकणाऱ्यांच्या यादीत ते आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. त्यांनी एकूण 20 वाईड बॉल टाकले.
यापूर्वी इंग्लंडने 2019 मध्ये आणि वेस्ट इंडीजने 2008 मध्ये पहिल्या डावात 21 वाईड टाकले होते. त्यामुळे कसोटीच्या पहिल्या डावात सर्वाधिक वाईड बॉल टाकण्याचा विक्रम हा संयुक्तरित्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्या नावावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.