विराटसोबत फोटो हवाय, तो इंस्टाग्रामवर टाकायचाय! रोहितबद्दलही कमेंट; कोण आहे Xara Jetly?

विराट कोहली व रोहित शर्मा हे जगातील दोन स्टार खेळाडू आहेत आणि त्यांचा जगभरात मोठा फॅन बेस आहे.. त्यात विराटच्या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या अधिक आहे आणि अशाच एका तरुणीला विराटसोबत फोटो हवा आहे.
Xara Jetly
Xara Jetlyesakal
Updated on

Virat Kohli Xara Jetly: विराट कोहलीने कालच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्दिची १६ वर्षे पूर्ण केली. २००८ मध्ये विराटने पदार्पण केले आणि १६ वर्षांच्या कारकीर्दित अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले. रोहित शर्माही भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे आणि भारताचा १७ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. विराट व रोहित यांचा जगभरात मोठा फॅन बेस आहे आणि त्यात रोज भर पडतच आहे. अशीच एक तरुणी झारा जेट्ली ( Xara Jetly) सध्या चर्चेत आली आहे.

विराट कोहलीने ११३ कसोटी सामन्यांत २९ शतकं व ३० अर्धशतकांसह ८८४८ धावा केल्या आहेत. कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक ७ द्विशतकं झळकावणारा तो भारतीय फलंदाज आहे. याशिवाय वन डेत त्याने २९५ सामन्यांत ५० शतकं व ७२ अर्धशतकांसह १३९०६ धावा केल्या आहेत. १२५ ट्वेंटी-२०त ४१८८ धावा त्याने चोपल्या आहेत आणि त्यात १ शतक व ३८ अर्धशतकं आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा एक दबदबा निर्माण केला आहे आणि त्याची फिटनेस अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

रोहितनेही आंतरराष्ट्रीय कारकीर्द गाजवली आहे. ५९ कसोटीत त्याने ४१३७ धावा केल्या असल्या तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचे वर्चस्व आहे. २६५ वन डे सामन्यांत त्याने १०८६६ धावा केल्या आहेत. त्यात ३१ शतकं व ५७ अर्धशतकं आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. १५९ ट्वेंटी-२०त ५ शतकं व ३२ अर्धशतकांसह ४२३१ धावा केल्या आहेत.

विराट व रोहित यांच्या फॅनमध्ये Xara Jetly या तरुणीची भर पडली आहे. न्यूझीलंडची गोलंदाज असलेली झारा हिला विराट व रोहित यांना गोलंदाजी करायची आहे. विराट कोहली हा या जनरेशनमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचेही ती म्हणते आणि तिला विराटसोबत फोटो काढून तो इंस्टाग्रावर पोस्ट करायचा आहे. हे तिचे ध्येय असल्याचे तिने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.