IND vs NZ: पुण्यात दाखल झाला न्यूझीलंड संघ! भारताविरुद्ध कसोटी मालिका विजयाच्या हेतूने उतरणार मैदानात

New Zealand team arrived in Pune to play test: भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंड संघ पुण्यात दाखल झाला आहे.
New Zealand Cricket Team
New Zealand Cricket TeamSakal
Updated on

India vs New Zealand Pune Test: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूला झाला. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे २४ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी आता सोमवारी (२१ ऑक्टोबर) न्यूझीलंडचा क्रिकेट संघ पुण्यामध्ये दाखल झाला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर कसोटी सामना खेळणार आहे.

यापूर्वी या मैदानात न्यूझीलंडने केवळ दोन वनडे सामने खेळले आहेत, या दोन्ही वनडेत न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अद्यापही न्यूझीलंड या मैदानात विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

New Zealand Cricket Team in Pune
New Zealand Cricket Team in PunePramod Shelar
New Zealand Cricket Team
IND vs NZ, Test: न्यूझीलंडने बंगळुरूचं मैदान जिंकलं! तब्बल ३६ वर्षांनी भारताला मायदेशात हरवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.