NZ vs AUS : अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय! जाणून घ्या 20 व्या षटकांतील थरार

अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना टीम डेव्हिडने टीम साऊथीच्या गोलंदाजीवर लाँग ऑनच्या दिशेने जोरकस फटका मारला. त्या फटक्यामध्ये इतकी ताकत होती की.....
New Zealand vs Australia T20I Marathi News
New Zealand vs Australia T20I Marathi Newssakal
Updated on

New Zealand vs Australia T20I : अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना टीम डेव्हिडने टीम साऊथीच्या गोलंदाजीवर लाँग ऑनच्या दिशेने जोरकस फटका मारला. त्या फटक्यामध्ये इतकी ताकत होती की, क्षेत्ररक्षक ग्लेन फिलिप्सही त्या चेंडूला अडवू शकला नाही. आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ६ विकेट राखून रोमहर्षक विजय साकारला.

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लॉकी फर्ग्युसनने या लढतीत प्रभावी मारा केला. पण क्षेत्ररक्षणात खराब कामगिरी केल्याचा फटका यजमान न्यूझीलंड संघाला यावेळी बसला. अष्टपैलू खेळी साकारणारा मिचेल मार्श (१/२१ व नाबाद ७२ धावा) सामन्याचा मानकरी ठरला.

New Zealand vs Australia T20I Marathi News
Ind vs Eng 3rd Test : कशी असणार चौथ्या कसोटीची खेळपट्टी? इंग्लंडच्या हुकमी फलंदाजाने बांधला रोहितच्या स्ट्रॅटजीचा अंदाज

न्यूझीलंडकडून ऑस्ट्रेलियासमोर २१६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. ट्रॅव्हिस हेडच्या पुनरागमनामुळे स्टीवन स्मिथला अंतिम अकरातून बाहेर काढले. हेडसोबत डेव्हिड वॉर्नर सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरला. ॲडम मिल्नच्या गोलंदाजीवर हेड २४ धावांवर बाद झाला. तर मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर वॉर्नर ३२ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर अवघ्या ११ चेंडूंमध्ये २५ धावांची खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला.

New Zealand vs Australia T20I Marathi News
Ind vs Eng : रांची कसोटीत 'हा' खेळाडू करणार टीम इंडियात पदार्पण? हे असेल गोलंदाजीचे कॉम्बिनेशन

अखेरच्या क्षणांतील रोमांच

२१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने १६ षटकांमध्ये ३ बाद १७० धावा केल्या होत्या. मिचेल सँटरनच्या १७व्या षटकांत फक्त तीन धावा दिल्या आणि जॉश इंग्लिसला (२० धावा) बाद केले.

१८व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर आठ धावा काढण्यात आला. ऑस्ट्रेलियासमोर अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी ३५ धावांची गरज होती. १९वे षटक टाकणाऱ्या ॲडम मिल्नच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाने १९ धावा लूटल्या. टीम डेव्हिडने या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर ४,६,६ अशा धावा वसूल केल्या.

New Zealand vs Australia T20I Marathi News
Ind vs Eng : बुमराह बाहेर गेला पण टेन्शन वाढलं! आता 'ही' जबाबदारी रोहितसोबत कोणाच्या खांद्यावर?

२०व्या षटकांतील थरार

ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची आवश्‍यकता होती. अनुभवी टीम साऊथीकडे चेंडू सोपवण्यात आला. त्याच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूंमध्ये फक्त चार धावा काढण्यात आल्या (वाईड पकडून). त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अखेरच्या तीन चेंडूंमध्ये १२ धावांची गरज होती. चौथा चेंडू यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस गेला आणि टीम डेव्हिडने षटकार खेचला.

पाचव्या चेंडूवर दोन धावा काढण्यात आल्या. अखेरच्या चेंडूवर चौकार मारून डेव्हिडने ऑस्ट्रेलियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्याआधी डेव्होन कॉनवे (६३ धावा), राचिन रवींद्र (६८ धावा) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ३ बाद २१५ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड - २० षटकांत ३ बाद २१५ धावा (फिन ॲलेन ३२, डेव्होन कॉनवे ६३, राचिन रवींद्र ६८, ग्लेन फिलिप्स नाबाद १९, मार्क चॅपमन नाबाद १८, मिचेल मार्श १/२१) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया २० षटकांत ४ बाद २१६ धावा (ट्रॅव्हिस हेड २४, डेव्हिड वॉर्नर ३२, मिचेल मार्श नाबाद ७२, ग्लेन मॅक्सवेल २५, जॉश इंग्लिस २०, टीम डेव्हिड नाबाद ३१, मिचेल सँटनर २/४२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.