IND vs NZ: सुट्टी नाही...! वर्ल्ड कप जिंकून आता भारताला टक्कर देणार; न्यूझीलंडचा संघ हरमनप्रीत कौरचं टेंशन वाढवणार

New Zealand Women ODI squad for series against India: न्यूझीलंड महिला संघाने नुकताच टी२० वर्ल्ड कप जिंकला. यानंतर आता लगेचच न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
New Zealand | Women's T20 world Cup 2024
New Zealand | Women's T20 world Cup 2024 Sakal
Updated on

India vs New Zealand Women ODI: न्यूझीलंड क्रिकेटमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाने नुकतेच रविवारी (२० ऑक्टोबर) महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली. असे असतानाच आता लगेचच न्यूझीलंडचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड महिला संघाला भारतीय महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाची घोषणा झाली आहे. आता मंगळवारी (२२ ऑक्टोबर) न्यूझीलंड महिला संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे टी२० वर्ल्ड कप जिंकलेल्या संघातील जवळपास सर्व खेळाडू न्यूझीलंडच्या वनडे संघातही आहे.

केवळ विश्वविजेत्या संघातील वेगवान गोलंदाज रोजमेरी मेअर आणि फिरकीपटू लेह कास्पेरेक यांना वनडे संघातून वगळण्यात आले आहे. रोजमेरी मेअरला विश्रांती देण्यात आली आहे.

New Zealand | Women's T20 world Cup 2024
नाचक्की ! Women's T20 World Cup 2024 च्या संघात फक्त एक भारतीय; न्यूझीलंड, आफ्रिकेचे ६ खेळाडू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.