India Women vs New Zealand Women 2nd ODI: रविवारी (२७ ऑक्टोबर) भारतीय महिला संघ न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळत आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंड महिला संघाने भारतासमोर २६० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ५० षटकात ९ बाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून अनुभवी खेळाडू आणि कर्णधार सोफी डिव्हाईन व सुझी बेट्स यांनी अर्धशतके झळकावली.
या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात घालण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर न्यूझीलंड संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.