T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

New Zealand Won ICC Women's T20 World Cup: न्यूझीलंडने महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.
Women's T20 World Cup 2024 Final
New Zealand Won Women's T20 World Cup 2024X/ICC
Updated on

ICC Women's T20 World Cup 2024 Final, NZ vs SA: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या ट्रॉफीवर न्यूझीलंड संघाने नाव कोरले आहे. त्यामुळे महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेला न्यूझीलंडच्या रुपात नवा विजेता मिळाला आहे. न्यूझीलंड महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला ३२ धावांनी पराभवाचा धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेसाठी ५ महिन्यातील हा टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील दुसरा पराभव आहे. महिला संघापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ जून महिन्याच्या अखेरीस पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध पराभूत झाला होता. त्यामुळे ५ महिन्यांच्या अंतरात दोनदा दक्षिण आफ्रिकेची टी२० वर्ल्ड कप जिंकण्याची संधी हुकली आहे.

तथापि, रविवारचा दिवस न्यूझीलंड क्रिकेटसाठी खास ठरला आहे. याचदिवशी सकाळी पुरुष संघाने भारताला ३६ वर्षांनी मायदेशात कसोटी सामन्यात पराभूक केले, तर रात्री महिला संघाने विश्वविजयावर नाव कोरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.