Most T-20 runs in 2024: वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरू आहे. या संपूर्ण लीगमध्ये निकोलस पूरन धमकेदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लीगमध्ये त्रिंबागो नाईट रायडर्सकडून खेळताना बार्बाडोस संघाविरुद्धच्या सामन्यात पूरनने नवा विक्रम रचला आहे.
बार्बाडोस विरुद्धच्या या खेळीत पूरनने १५ चेंडूत २७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार व एक षटकार ठोकला. परंतु नवीन उल हकच्या गोलंदाजीवर झेलबाद होत पुरन माघारी परतला.
या खेळीसोबत पूरनने २०२४ वर्षात २०५९ ट्वेंटी-२० धावा पूर्ण केल्या. एका वर्षात सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पूरनने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.
मोहम्मद रिझवानने २०२१ मध्ये ४५ डावांत २०३६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये एक शतक आणि १८ अर्धशतकांचा समावेश होता.
पूरनने रिझवानचा हा विक्रम १४ अर्धशतके ठोकत ६५ डावांमध्ये मोडला. हे तिसरे वर्ष आहे ज्यात पूरनने १००० पेक्षा अधिक ट्वेंटी -२० धावा केल्या आहेत. याआधी त्याने २०१९ आणि २०२३ मध्ये १००० पेक्षा अधिक ट्वेंटी-२० धावा केल्या होत्या.
निकोसल पूरनने कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ९ डावांमध्ये एकूण ३१२ धावा बनवल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत मोठी खेळी ९७ धावांची होती. पूरनने लीगदरम्यान २ अर्धशतके, २६ चौकार व २६ षटकार ठोकले आहेत. पूरन सीपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.
निकोसल पूरन - ६५ डावांत २०५९ धावा (२०२४)
मोहम्मद रिझवान -४५ डावांत २०३६ धावा (२०२१)
अॅलेक्स हेल्स - ६१ डावांत १९४६ धावा (२०२२)
जॉस बटलर - ५५ डावांत १८३३ धावा (२०२३)
मोहम्मद रिझवान -४४ डावांत १८१७ धावा (२०२२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.