PAK vs ENG: इंग्लंडला रोखण्यासाठी पाकिस्तानचे जुन्या फलंदाजाला पाचारण

World Test Championship Rankings: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर झाला आहे.
Pakistan vs new zealand
Pakistan vs new zealandesakal
Updated on

Pakistan vs Engalnd test series: पाकिस्तानमधील मुल्तान येथे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार पदाची धुरा शान मसूदकडे कायम असून ३७ वर्षीय अनुभवी फिरकीपटूला संघात आमंत्रण दिले गेले आहे.

पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानने डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अलीचा संघात समावेश केला आहे.

२०२३ मध्ये शेवटची कसोटी खेळणारा ३७ वर्षीय अली, दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज खुर्रम शाहजादच्या जागी खेळणार आहे. त्याने पाकिस्तानसाठी १५ कसोटी सामने खेळले असून ४७ विकेट्स घेतले आहेत. श्रीलंकेविरुद्ध आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात अलीने ७० धावांत ७ बळी घेतले होते.

Pakistan vs new zealand
India vs New Zealand: भारतीय फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांचा कस लागणार, न्यूझीलंडच्या खेळाडूनंच दिला सावधानतेचा इशारा

बांगलादेशविरूद्धची मालिका पाकिस्तानने ३-० ने गमवल्यानंतर जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत पाकिस्तान आठव्या स्थानी आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानात मागच्या १० कसोटी मालिकांपैकी एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ज्यामध्ये २०२२ मध्ये इंग्लंडकडून ३-० पराभूत झालेल्या मालिकेचाही समावेश आहे.

पाकिस्तान-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघ:

शान मसूद (कर्णधार), साऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सईम अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी.

पाकिस्तान-इंग्लंड कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, गस ॲटकिंन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट , जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.