T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

West Indies Squad: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला त्यांच्या १५ जणांच्या संघात मोठा बदल करावा लागला आहे.
Hardik Pandya | Jason Holder
Hardik Pandya | Jason HolderSakal
Updated on

West Indies Squad: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आता आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. अशातच वेस्ट इंडिज संघाला त्यांच्या 15 जणांच्या संघात मोठा बदल करावा लागला आहे.

वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेसन होल्डर नुकतेच काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर आता वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयला 15 जणांच्या संघात संधी देण्यात आली आहे.

Hardik Pandya | Jason Holder
T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

दरम्यान, होल्डरला नक्की कोणती दुखापत झाली आहे आणि त्याला त्यातून सावरण्यासाठी किती वेळ लागणार आहे, याबाबत वेस्ट इंडिजने खुलासा केलेला नाही. पण त्यांनी सांगितले आहे की त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी काही काळ लागणार असून त्याला संघाच्या वैद्यकीय टीमकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे प्रमुख देसमंड हाईन्स म्हणाले, 'जेसन आमच्या संघातील एक अनुभवी खेळाडू आहे. त्याची कमतरता आम्हाला मैदानात आणि मैदानाबाहेरही जाणवेल. आम्हाला तो पुन्हा पूर्ण तंदुरुस्त हवा आहे.'

'जेसनसारख्या खेळाडूला गमावणे आमच्यासाठी दुर्दैवी आहे, पण आम्हाला ओबेड मॅकॉयच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.ओबेडने त्याच्या कामगिरीतून त्याचे कौशल्य सिद्ध केले आहे आणि त्याला पुढेही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे कौशल्य दाखवण्याची संधी आता आहे.'

Hardik Pandya | Jason Holder
IPL Final, KKR vs SRH: स्टार्कचा स्विंग अन् अभिषेकचा झाला झुलता पूल... हैदराबादचं 'हेड'ही स्वस्तात पडलं; पाहा Video

टी20 वर्ल्ड कपसाठी असा आहे वेस्ट इंडिज संघ -

रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, शाय होप (यष्टीरक्षक), अकील होसेन, शेमार जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅकॉय, गुडाकेश मोती, आंद्रे रसेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.

राखीव खेळाडू - काइल मेयर्स, मॅथ्यू फोर्ड, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श आणि आंद्रे फ्लेचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.