जग्गजेतेपद गमावलं, तरी छप्परतोड कमाई; भारतीय अर्थव्यवस्थेने ODI World Cup 2023 नंतर कमवले '११ हजार कोटी'

Economic impact of ICC ODI World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमुळे भारताला मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
India vs Australia | ODI World Cup 2024
India vs Australia | ODI World Cup 2024Sakal
Updated on

ODI World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत भारतात यशस्वीपणे आयोजित करण्यात आली होती. अनेक संघांनी आणि खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने ही स्पर्धा गाजवली देखील. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे मोठे संघ अंतिम सामना देखील खेळले होते, ज्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात करत विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता.

भारतातील तब्बल १० शहरांमध्ये झालेल्या या स्पर्धेतून मोठा आर्थिक फायदाही झाला असल्याचे आता समोर आले आहे. आयसीसीने बुधवारी सर्वसमावेशक आर्थिक अहवाल सादर केला, ज्यात या स्पर्धेदरम्यान झालेल्या फायद्याचीही माहिती देण्यात आली.

५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान झालेल्या या स्पर्धेने भारताच्या महसुलात तब्बल १.३९ बिलियन अमेरिक डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण ११,६३७ कोटी रुपयांची भर टाकली आहे.

India vs Australia | ODI World Cup 2024
T20 World Cup 2024: सूर्याची दहशत! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला दुसऱ्याने घेतलेल्या कॅचमध्येही दिसतोय आपला यादव
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.