Sourav Ganguly Bowling: सौरव गांगुली म्हटलं अनेकांसमोर एक निडर कर्णधार, उत्तम फलंदाज असं व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. गांगुलीने त्याची ओळखही तशीच निर्माण केली. पण अनेकांना कदाचित हे माहित नसावं की गांगुली हा चांगला पार्ट-टाईम गोलंदाजही होता, जो कधीकधी गरज लागेल तेव्हा काही षटके सामन्यात गोलंदाजी करायचा.
त्याने अनेक सामने त्याच्या नेतृत्वाने आणि फलंदाजीने गाजवले असले, तरी एक असा सामना आहे, जो त्याने त्याच्या गोलंदाजीने गाजवला. हा सामना म्हणजे १८ सप्टेंबर १९९७ रोजी झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान वनडे सामना.
भारत आणि पाकिस्तान या संघात कॅनडामध्ये १९९७ साली ५ सामन्यांची वनडे मालिका झालेली. या मालिकेतील तिसरा सामना टोरोंटोला झालेला. या सामन्यात गांगुलीने चक्क ५ विकेट्स घेतल्या होत्या.