On This Day: पेशानं वकील, पण रक्तातच होतं क्रिकेट; ज्यांच्या हातून बॉल सुटणं कठीण असे कोण आहेत विकेटकिपर डेव्हिड रिचर्डसन?

Who is David Richardson: काही नावाजलेल्या यष्टीरक्षकांमध्ये एक नावही आवर्जून घ्यायला हवं, ते नाव म्हणजे डेव्हिड रिचर्डसन.
David Richardson
David RichardsonSakal
Updated on

Know About David Richardson: क्रिकेटमधील काही नावाजलेल्या यष्टीरक्षकांमध्ये एक नावही आवर्जून घ्यायला हवं, ते नाव म्हणजे डेव्हिड रिचर्डसन. दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेले रिचर्डसन यांनी यष्टीरक्षक म्हणून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला.

खरंतर दक्षिण आफ्रिकेवर ९० च्या दशकाआधी जी बंदी होती, त्यात अर्धी कारकिर्द गेलेली असतानाही १९९१ मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. इतकेच नाही, तर त्यांनी त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी ७ वर्षे क्रिकेटही खेळले.

१६ सप्टेंबर १९५९ रोजी जोहान्सबर्गला जन्म झालेल्या रिचर्डसन यांना क्रिकेटचं बाळकडू कुटुंबातूनच मिळालं होतं. त्यांचे वडील जॉन रिचर्डसन, भाऊ राल्फ रिचर्डसन आणि चुलत भाऊ रॉरी रिचर्डसन हे सर्व प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. विशेष म्हणजे रिचर्डसन यांचा मुलगा मायकल यानेही क्रिकेटमध्येच करियर केलं.

David Richardson
Fact Check: विराट कोहली अन् तेजस्वी यादव खरंच एकत्र क्रिकेट खेळलेत? Viral Video तील दाव्यात किती सत्य, वाचा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.