Gautam Gambhir Birthday: भारताच्या वर्ल्ड कप विजयांचा हिरो ते टीम इंडियाचा कोच, डॅशिंग गंभीरची कशी राहिली कारकिर्द?

Gautam Gambhir Career: भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा सोमवारी ४३ वा वाढदिवस आहे. त्याची आत्तापर्यंत कधी कारकिर्द राहिली जाणून घ्या.
Gautam Gambhir
Gautam GambhirSakal
Updated on

On This Day in Cricket: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात गौतम गंभीर हे नाव कायमसाठी कोरलं गेलेलं आहे ते त्याच्या कर्तुत्वामुळे. १४ ऑक्टोबर १९८१ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेल्या गंभीरचा एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास आता मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे त्याने केवळ वयाच्या ४३ वर्षात हे यश मिळवले आहे. गंभीरच्या कारकि‍र्दीला अनेक पैलू आहेत, त्याचाच आढावा घेऊ.

खेळाडू म्हणून यश

गौतम गंभीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळताना शानदार कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००३ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. त्याने सलामीलाच नाही, तर मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध ढाका येथे एप्रिल २००३ मध्ये वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

त्याने त्याच्या कारकि‍र्दीत ५८ कसोटी सामने खेळताना ९ शतके आणि २२ अर्धशतकांसह ४१५४ धावा केल्या आहेत. १४७ वनडेत त्याने ११ शतके आणि ३४ अर्धशतकांसह ५२३८ धावा केल्या आहेत.

त्याने ३७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ९३२ धावा केल्या, ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. तो भारतासाठी १० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.

Gautam Gambhir
कोच Gautam Gambhirला पहिल्या वन-डे मालिकेत हरवणारा 'गुरू' श्रीलंकेने कायम ठेवला

त्याच्या नावावर कसोटीमध्ये सलग ५ शतके करण्याचा विक्रमही आहे. त्याने २००९-२०१० दरम्यान हा कारनामा केला. असा पराक्रम करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

त्याने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही, तर आयपीएलमध्येही फलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना १५४ सामन्यांमध्ये ३६ अर्धशतकांसह ४२१७ धावा केल्या आहेत.

भारताच्या वर्ल्ड कप विजयांचा हिरो

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा आक्रमक भूमिका गंभीरची दिसायची. तो कधी प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वाद घालण्यासाठीही मागे हटायचा नाही. त्यामुळे अनेकदा त्याचे वादही मैदानात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. असे असले तरी गंभीरने भारताच्या दोन विश्वविजयांच हिरो आहे.

त्याने भारताला २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

त्याने २००७ टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली होती. तसेच २०११ वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली होती. त्याच्या या दोन्ही खेळी भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या होत्या.

Gautam Gambhir
On This Day: मॅगीवर भूक भागवण्यापासून ते टीम इंडियाचा हुकमी एक्का बनणाऱ्या हार्दिक पांड्याच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम

कर्णधारपद

गंभीरने केवळ फलंदाज म्हणून नाही, तर कर्णधार म्हणूनही त्याच्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. गंभीरने ६ वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यातील ५ सामने त्याने न्यूझीलंडविरुद्ध, तर एक सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नेतृत्व केले आहे.

या सहाही सामन्यात भारताने विजय मिळवले आहे. त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने नेतृत्व करताना २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

राजकारण

गंभीरने खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्याने २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूकही लढवली. तो उत्तर दिल्लीमध्ये खासदारही झाला होता. यादरम्यान, त्याने काही सामाजिक कार्यही केली.

दरम्यान, २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी त्याने काही काळ राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तो राजकारणात असतानाच समालोचक म्हणूनही काम करत होता.

Gautam Gambhir
On This Day: वॉशिंग्टन नावामागील सुंदरची कहाणी, एका कानाने ऐकू येत नसूनही मिळवली टीम इंडियात जागा, जाणून घ्या त्याच्याबद्दल

प्रशिक्षक

दरम्यान, गंभीरने प्रशिक्षण क्षेत्रातही आपली प्रतिभा दाखवली आहे. त्याने २०२२ आणि २०२३ आयपीएल हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली. या दोन्ही वर्षी या संघाने आयपीएल प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. २०२४ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर झाला.

विशेष म्हणजे त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने आयपीएलचे यंदा विजेतेपदही मिळवले. यानंतर लगेचच त्याने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदही स्वीकारले. त्याला बीसीसीआयने २०२७ अखेरपर्यंत मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे सध्या तो भारतीय संघाला मार्गदर्शन करताना दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.