On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

Rashid Khan Career: राशिद खान शुक्रवारी त्याचा २६ वा वाढदिवस साजरा करत असून त्याच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात जाणून घ्या.
Rashid Khan
Rashid KhanSakal
Updated on

On This Day in Cricket: आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजीत एक नवी ओळख निर्माण करणारा खेळाडू म्हणजे राशिद खान. राशिदने टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. राशिद शुक्रवारी (२० सप्टेंबर) त्याचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

अफगाणिस्तानमध्ये २० सप्टेंबर १९९८ मध्ये जन्मलेला राशिद लहानपणी आभ्यासातही हुशार होता. त्याला डॉक्टरही बनायचे होते. पण क्रिकेटची आवड त्याला मैदानापर्यंत घेऊन आली. त्याने लहानवयातच क्रिकेटमध्ये मोठी प्रगती केली.

अवघ्या १७ व्या वर्षी त्याने अफगाणिस्तानसाठी वनडे पदार्पण केले. राशिदने त्याच्या कारकि‍र्दीत सुरुवातीपासूनच त्याच्या गोलंदाजीत किती प्रतिभा आहे, हे सिद्ध केलं. त्याला त्याची जागा बनवायला फार वेळ लागला नाही.

त्याच्या लेगस्पिनने तो टी२० क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू ठरला. चेंडू तो फार वळवत नाही, पण हवेबरोबर तो त्याच्या चेंडूला जी गती देतो, त्याचा फायदा त्याला मिळतो. गुगली हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे.

Rashid Khan
Rashid Khan : दुसरी धाव नाकारली, कर्णधार राशिदने बॅटच फेकली... एवढंच नाही अफगाणिस्तान संघाचे अनेक Video होतायत ट्रेंड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.