On This Day: गावसकरांचा उजवा हात समजले जाणारे लढवय्या फलंदाज अन् प्रशिक्षक अंशुमन गायकवाड, जाणून घ्या कशी राहिली कारकिर्द

Aunshuman Gaekwad Birthday : भारतीय क्रिकेटमधील ७०-८० च्या दशकातील एक महत्त्वाचा फलंदाज म्हणजे अंशुमन गायकवाड. आज म्हणजे २३ सप्टेंबर रोजी त्यांची जयंती आहे.
Aunshuman Gaekwad
Aunshuman GaekwadSakal
Updated on

On This Day in Cricket 23rd September: भारतीय क्रिकेटमधील ७०-८० च्या दशकातील एक महत्त्वाचा फलंदाज म्हणजे अंशुमन गायकवाड. आज म्हणजे २३ सप्टेंबर रोजी त्यांची जयंती आहे. अंशुमन गायकवाड यांचा जन्म गुजरातमधील एका चांगल्या कुटुंबात झाला होता.

त्यांचे वडील दत्ता गायकवाड हे देखील क्रिकेटपटू होते. त्यांनीही भारतासाठी क्रिकेट खेळले. वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत अंशुमन यांनीही क्रिकेटमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९६९-७० च्या दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी बडोदाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत असताना त्यांना डिसेंबर १९७४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताला झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली.

त्यांनी त्यानंतर पुढच्या १० वर्षात ४० कसोटी सामने खेळले. यादरम्यान, त्यांनी सुनील गावसकरांबरोबर सलामीला फलंदाजी केली. सुनील गावसकरांचे भरवशाचे साथीदार आणि त्यांचा एकप्रकारे उजवा हातच अंशुमन गायकवाड यांना समजले जाते.

Aunshuman Gaekwad
Anshuman Gaekwad : अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला BCCI धावली! जय शाहने इतके कोटी रुपये देण्याचे दिले आदेश

अंशुमन यांच्या फलंदाजी लयबद्ध आणि सुरेख नव्हती, पण त्यांच्याकडे अफलातून एकाग्रतेने फलंदाजी करण्याची क्षमता होती. द्रविडपूर्वी ते भारताचे द वॉल होते. त्यांनी त्यांच्या बचावात्मक शैलीच्या फलंदाजीने अनेक सामने भारतासाठी वाचवले.

त्यांनी १९८२-८३ हंगामात जलंधर येथे पाकिस्तानविरुद्ध तब्बल ६७१ मिनिटे आणि ४३६ चेंडू खेळताना द्विशतकी खेळी केली होती. तेव्हाची हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात हळू केलेलं द्विशतक होतं.

इतकंच नाही, तर ज्या काळात हेल्मेट नसताना आणि बाउंसरवर कोणतेही नियंत्रण नसताना वेस्ट इंडिजच्या त्या काळातील घातक गोलंदाजीचा सामना केला होता. १९७५-७६ हंगामात झालेल्या कसोटी सामन्यात भारताचे कर्णधार बिशनसिंग बेदी यांनीच वेस्ट इंडिजचे घातक आक्रमणाविरुद्ध फलंदाजी न करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता, त्याचवेळी गायकवाड यांनी तिथे उभे राहुन झुंजार ८१ धावांची खेळी केली होती. पण मायकल होल्डिंग यांच्या गोलंदाजीने त्यांना जखमी केले. त्यांच्या कानाला चेंडू जोरात लागला, ज्यामुळे त्यांना शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली.

Aunshuman Gaekwad
दुःख होतंय! कॅन्सरशी लढणाऱ्या माजी कोचसाठी कपिल देव यांच्यासह अनेक खेळाडू एकवटले; BCCI कडे विनंती

अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी सामन्यांमध्ये ३०.०७ च्या सरासरीने २ शतके आणि १० अर्धशतकांसह १९८५ धावा केल्या. तसेच २ विकेट्स घेतल्या. त्यांनी १५ वनडे सामने खेळताना २६९ धावा केल्या.

अंशुमन यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत एकूण २०६ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी ३४ शतके आणि ४७ अर्धशतकांसह १२१३६ धावा केल्या, तर १४३ विकेट्स घेतल्या. त्यांनी ५५ लिस्ट ए सामन्यांमध्ये १६०१ धावा केल्या, तर २२ विकेट्स घेतल्या.

त्यांनी १९९१-९२ हंगामानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्यांचं क्रिकेटशी असलेलं नातं संपलं नाही. त्यांनी १९९७ ते १९९९ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदा जबाबदारी सांभाळलेली. त्यानंतर ते पुन्हा २००० मध्ये भारताचे प्रशिक्षक झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेत उपविजेता ठरला होता.

जॉन राईट यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांनी बराच काळ नंतर केनिया संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले. त्यांना २०१८ मध्ये बीसीसीआयकडून सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.

दरम्यान, अंशुमन गायकवाड यांनी त्यांच्या शेवटच्या काहीवर्षात कर्करोगाशी झुंज दिली. त्यावेळी त्यांना आर्थिक समस्याही जाणवल्या होत्या. त्यावेळी त्यांचे साथीदार क्रिकेटपटू मदतीला पुढे आले होते. तसेच बीसीसीआयनेही आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र त्यांची कर्करोगाशी असलेली झुंज ३१ जुलै २०२४ रोजी संपली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.