On This Day in Cricket 28th September: पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले. एक अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून त्यांनी मोठे यश मिळवले. पण त्यांच्या घरातच क्रिकेटचं वातावरण होतं. त्यांचा मोठा चुलत भाऊ माजीद खान हे देखील पाकिस्तानचे मोठे खेळाडू राहिले आहेत. त्यांच्याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊ.
२८ सप्टेंबर १९४६ रोजी भारतातील पंजाबमधील लुधियाना येथे त्यांचा जन्म झाला होता. वडील क्रिकेट खेळायचे. त्यामुळे त्यांनाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्यांनी क्रिकेटची सुरुवात आधी वेगवान गोलंदाज म्हणून केली होती.
मात्र त्यांच्या पाठीला दुखापत झाली आणि मग त्यांच्या बाऊंसरवर मर्यादा येतील की काय असं वाटल्याने ते पार्टटाईम ऑफस्पिनर झाले आणि त्यांनी मग फलंदाजीकडे अधिक लक्ष्य केंद्रित केलं.
त्यांनी फलंदाजी करताना केलेल्या कामगिरीने त्यांना फलंदाजी क्रमांकामध्ये बढतीही मिळाली. त्यामुळे ते मधल्या फळीत फलंदाजी करायला लागले. त्यांचे ड्राईव्हचे फटके आणि हुक शॉट ताकद होती.
त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी १९६४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ६३ कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी ८ शतकांसह ३९३१ धावा केल्या, तसेच २७ विकेट्स घेतल्या. त्यांनी २३ वनडे सामनेही खेळले, ज्यात ७८६ धावा केल्या आणि १३ विकेट्स घेतल्या.
त्यांनी कॅमब्रिज युनिव्हर्सिटी, ग्लॅमॉर्गन, क्विन्सलँड या संघांचंही प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७६-७७ त्या हंगामात कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत लंच होण्यापूर्वी शतक ठोकले होते. त्यावेळी ४२ वर्षांमधअये असा कारनामा करणारे ते पहिले खेळाडू होते. त्यांनी ग्लॅमॉर्गनविरुद्ध पाकिस्तानसाठी ८९ मिनिटात १४७ धावांची खेळीही केलेली.
त्यांनी एकूण ४१० प्रथम श्रेणी सामने खेळताना ७३ शतकांसह २७४४४ धावा केल्या आणि २२३ विकेट्स घेतल्या. त्यांनी लिस्ट ए क्रिकेटचे १६८ सामने खेळताना ४४४१ धावा केल्या आणि ७१ विकेट्स घेतल्या. पण त्यांच्या कारकिर्दीची शेवट काहीशा वादाने झाला.
त्यांचाच चुलत भाऊ असलेल्या इम्रान खान यांना त्यांना संघातून वगळावं लागलं होतं. ज्यामुळे त्यांच्या नात्यातही कटूता आली होती. पण खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर त्यांनी आयसीसी मॅच रेफ्री म्हणून काम पाहिले. तसेच ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.