On This Day in Cricket: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने आजपर्यंत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या, पण त्यातही त्याची एक खेळी आहे, ज्याचा ठसा आजही चाहत्यांच्या मनावर उमटलेला आहे.
त्याने जयपूरला श्रीलंकेविरुद्ध १८३ धावांची खेळी केली होती. आज (३१ ऑक्टोबर) या खेळीला १९ वर्षे पूर्ण होत आहे. या खेळीने धोनीला घराघरात पोहचवलं. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळी विशाखापट्टणमला केली होती, तेव्हा त्याची ओळख क्रिकेट चाहत्यांना कळाली होती, पण १८३ धावांच्या खेळीने या खेळाडूमध्ये काहीतरी आहे, हे क्रिकेट प्रेक्षकांना जाणवलं.
त्यातच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज अशा प्रकारची फलंदाजी करताना पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं. त्याने त्यावेळी केलेला विश्वविक्रम आजही १९ वर्षांनंतर त्याच्याच नावावर आहे. त्याने ही खेळी केलेल्या सामन्याबद्दल जाणून घेऊया.
साल २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारत दौऱ्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना त्यांना जयपूरला खेळायचा होता. याआधीचे दोन्ही सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात श्रीलंका संघ पुनरागमनाच्या इराद्याने मैदानात उतरला होता.