On This Day: वॉशिंग्टन नावामागील सुंदरची कहाणी, एका कानाने ऐकू येत नसूनही मिळवली टीम इंडियात जागा, जाणून घ्या त्याच्याबद्दल

Washington Sundar Birthday: भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरचा शनिवारी (५ ऑक्टोबर) २५ वा वाढदिवस आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Washington Sundar
Washington SundarSakal
Updated on

On This Day in Cricket 5th October: भारतीय क्रिकेटमध्ये कमी वयातच आपलं नाव गाजवणाऱ्यांमध्ये वॉशिंग्टन सुंदर देखील आहे. त्याने आत्तापर्यंत भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे.

२०२१ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या प्रसिद्ध द गॅबा कसोटी विजयात जसा ऋषभ पंतने मोलाचा वाटा उचललेला, तसाच मोलाचा वाटा वॉशिंग्टन सुंदरचाही होता.

त्याने त्या सामन्यातून कसोटीमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या, यामध्ये स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन आणि डेव्हिड वॉर्नर या मुख्य विकेट्सचा समावेश होता. इतकंच नाही त्याने फलंदाजी करताना पहिल्या डावात ६२ धावांची खेळी करताना शार्दुल ठाकूरबरोबर शतकी भागीदारी केली होती.

याशिवाय दुसऱ्या डावात पंतबरोबर अर्धशतकी भागीदारी केली होती. वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघातील अनियमित सदस्य असला, तरी तो तामिळनाडू संघातील प्रमुख खेळाडू आहेत. त्याच्या फिरकी गोलंदाजीबरोबर त्याचे फलंदाजीही संघासाठी महत्त्वाची ठरते.

Washington Sundar
On This Day: आठवणीतील पहिला टी२० वर्ल्डकप अन् भारताला जेतेपद, धोनी बनलेला विश्वविजेता कर्णधार

वॉशिंग्टनने लहान वयापासूनच त्याच्यातील चमक दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याने वयाच्या ११ व्या वर्षी चेन्नईमध्ये दुसऱ्या डिव्हिजन लीगमध्ये खेळण्यास सुरूवात केली होती. एमआरएफच्या पेस अकॅडमीमध्येही त्याची १३ व्या वर्षी निवड झालेली.

५ ऑक्टोबर १९९९ साली जन्मलेल्या वॉशिंग्टन सुंदरने २०१६ साली १९ वर्षांखालील टी२० वर्ल्ड कपही खेळला. त्याने २०१७ साली रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो त्यावेळी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. त्याने १७ वर्षे १९९ दिवसांचा असताना पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याचवर्षी म्हणजे डिसेंबर २०१७ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

तो आत्तापर्यंत ४ कसोटी सामने, २२ वनडे आणि ४९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला आहे. त्याने कसोटीत ३ अर्धशतकांसह २६५ धावा केल्यात आणि ६ विकेट्स घेतल्यात. त्याने वनडेमध्ये ३१५ धावा केल्यात आणि २३ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने १६० धावा आणि ४४ विकेट्स घेतल्या आहेत.

Washington Sundar
On This Day: दीडशे वर्षांच्या इतिहासात दोनच कसोटी मॅच 'टाय', ज्यात भारताच्याही सामन्याचा समावेश; जाणून घ्या त्याबद्दल

नावामागील खास कहाणी

दरम्यान अनेकांना प्रश्न पडला असेल की त्याचं नाव वॉशिंग्टन का ठेवलं असेल. वॉशिंग्टन शहराशी काही संबंध असेल का? तर त्यामागील कारण म्हणजे हे नाव त्याच्या वडिलांनी त्यांचे मार्गदर्शक पी़डी वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ ठेवलं.

वॉशिंग्टनचे वडील एम सुंदर हे देखील क्रिकेटपटू होते. त्यांचं नाव रणजी ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूंमध्येही आलेलं होतं. दरम्यान, त्यांच्या घराच्या जवळच पीडी वॉशिंग्टन हे निवृत्ती आर्मी ऑफिसर रहायचे. त्यांनाही क्रिकेट खूप आवडायचे. त्यांना एम सुंदर यांचा खेळही आवडू लागला. त्यावेळी त्यांनी त्यांना आर्थिक सहाय्य केलं होतं.

ते एम सुंदर यांना युनिफॉर्म घेऊन द्यायचे, शाळेची फी देखील भरायचे आणि कधीकधी त्यांच्या सायकलवरून मैदानातही सोडायचे. मात्र १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्याचवर्षी एम सुंदर यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली.

आधी त्यांनी त्याचं नाव श्रीनिवासन ठेवलं होतं. पण नंतर त्यांनी पीडी वॉशिंग्टन यांच्या प्रेमापोटी आपल्या मुलाचं नाव वॉशिंग्टन असं ठेवलं. तेव्हापासून तो वॉशिंग्टन सुंदर म्हणून ओळखला जातो.

Washington Sundar
On This Day: आठ वर्षांचा असताना वडिलांना आयुष्य संपवताना पाहिलं, आई दोनदा कॅन्सरशी लढली, तरीही बेअरस्टो परिस्थितीला हरवत खंबीर उभा राहिला

वॉशिंग्टन सुंदरला एका कानाने येत नाही ऐकू

वॉशिंग्टनने क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली असली, तरी अनेकांना हे माहित नाही की त्याला एका कानाने कमी ऐकू येतं. तो ४-५ वर्षांचा असताना त्याला आणि त्याच्या पालकानां हे लक्षात आलं.

त्यानंतर त्यांनी त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारही कले, पण त्याचा फायदा झाला नाही. पण असं असलं तरी वॉशिंग्टन सुंदरने ही गोष्ट त्याच्या विरोधात जाऊ न देता क्रिकेटमध्ये आपलं करियर घडवलं.

वॉशिंग्टनने आत्तापर्यंत ३० प्रथम श्रेणी सामने खेळले असून ५९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १ शतक आणि ८ अर्धशतकांसह १२४६ धावा केल्या आहेत. त्याने ७७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ७३ विकेट्स घेतल्यात आणि २ अर्धशतकांसह ९८३ धावा केल्या. टी२० क्रिकेटमध्ये १४४ सामन्यांमध्ये १०९ विकेट्स घेतल्या आहेत, तसेच १२६२ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.