Zaheer Khan: अहमदनगरचा सुपूत्र ते टीम इंडियाचा घातक गोलंदाज, कशी राहिली नकल बॉल स्पेशालिस्ट झहीरची कारकिर्द

Zaheer Khan Birthday: भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान सोमवारी त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्या.
Zaheer Khan
Zaheer KhanSakal
Updated on

On This Day in Cricket 7th October: भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाजांबद्दल जेव्हाही चर्चा होईल, तेव्हा एक नाव हमखास घेतलं जाईल, ते म्हणजे झहीर खान. ७ ऑक्टोबर १९७८ रोजी अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये जन्मलेला झहीर खानने क्रिकेट खेळण्याच्या जिद्दीनं अनेक चढ-उतार सहज पार करत त्याची वेगळी ओळख निर्माण केली.

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या झहीरसाठी नकल बॉल हे त्याचं अस्त्र होतं. पण फक्त नकल बॉलच नाही, तर नवीन चेंडूवर स्विंग आणि जुन्या चेंडूवर रिव्हर्स स्विंग करण्यातही तो माहिर होता.

इंजिनियरिंग सोडून क्रिकेटकडे वळलेल्या झहीरने बडोद्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर मुंबईकडून बरीच वर्षे क्रिकेट खेळले. त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं ते २००० साली आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी (चॅम्पियन्स ट्रॉफी) स्पर्धेतून.

त्याने केनियाविरुद्ध पहिल्याच सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. पण त्या स्पर्धेत त्याने स्टीव्ह वॉ यांना केलेलं क्लिन-बोल़्ड आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात असेल.

Zaheer Khan
Mumbai Indians चा खास माणूस LSG ने फोडला: Zaheer Khan आयपीएल २०२५ मध्ये मेंटॉरच्या भूमिकेत

त्याने २००० मध्येच बांगलादेशविरद्ध ढाकाला झालेल्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. झहीर त्याच्या प्रभावी वेगवान गोलंदाजीने आणि गोलंदाजीतील नियंत्रणाने प्रभावित करत भारतीय संघातील स्थान पक्के केले. त्याने २००३ साली झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्येही १८ विरेट्स घेतल्या. मात्र अंतिम सामन्यात त्याची कामगिरी चांगली झाली नाही.

२००७ वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला आपला गाशा लवकर गुंडाळावा लागला होता. पण त्या स्पर्धेतही झहीरने तीन सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या.

त्याच्यासाठी २०११ साली भारताने जिंकलेला वनडे वर्ल्ड कप अविस्मरणीय राहिला. त्याने त्या स्पर्धेत सर्वाधिक २१ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यातही त्याने प्रभावी गोलंदाजी केली होती. त्याने २०१० साली झालेला आशिया कप भारताला जिंकून देण्यातही त्याने मोलाचा वाटा उचलला होता.

Zaheer Khan
IND vs BAN: मयंक, नितीशच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे IPL फ्रँचायझींच्या खिशाला पडणार खड्डा; कसा ते जाणून घ्या

दरम्यान, त्याच्या कारकि‍र्दीत काही कठीण क्षणही आले. त्याला अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला. २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया असताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याच्या भारतीय संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्याचवेळी आरपी सिंगही त्याची जागा निर्माण करू पाहात होता.

पण असं असतानाही झहीरने मागे वळून न पाहाता, पुन्हा नेट्समध्ये जाऊन मेहनत घेण्यास सुरुवात केली. त्याने २००६ साली काऊंटी क्रिकेटमध्ये वॉर्सेस्टरशायरकडून खेळताना तब्बल ७८ विकेट्स घेत, त्याची क्षमता पुन्हा सिद्ध केली. त्यावेळी त्याला वॉर्सेस्टरशायर संघात झिप्पी झॅकी असं नावही पडलं.

झहीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत ९२ कसोटीत ३११ विकेट्स घेतल्या. तसेच ३ अर्धशतकांसह त्याने १२३१ धावाही केल्या. तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे.

त्याने वनडेमध्ये २०० सामन्यांत २८२ विकेट्स घेतल्या. तसेच १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये तीन संघांकडून खेळताना १०० सामन्यांमध्ये १०२ विकेट्स घेतल्या.

झहीरने २०१४ साली न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. त्याच्या कारकि‍र्दीत अखेरच्या काळात त्याला दुखापतीने घेरले होते. दरम्यान क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो आयपीएलमध्ये कोचिंग स्टाफमध्ये दिसतो. तो आता आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.