On This Day: जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आलेलं हिटमॅनचं वादळ, द्विशतक करत सचिन-सेहवागच्या पंक्तीत मिळवलेलं स्थान

Rohit Sharma 1st ODI Double Century: आजच्या दिवशी २०२३ मध्ये रोहित शर्माने पहिले वन-डे द्विशतक झळकावले होते.
Rohit sharma
Rohit sharmaesakal
Updated on

On This Day in Cricket: आजच्या दिवशी (२ नोव्हेंबर २०१३) भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया प्रतिष्ठेच्या सामन्यात भारतीय फलंदाज रोहित शर्माने विक्रमी द्विशतक झळकावले. रोहितने २०१३ मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे वन-डे क्रिकेटमधील आपले पहिले द्विशतक ठोकले आणि हिटमॅन म्हणून प्रसिद्धी मिळवली.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका निर्णायक ठरली आणि रोहित शर्माने या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्माच्या नावावर असलेल्या तीन वन-डे द्विशतकांपैकी पहिले द्विशतक त्याने या सामन्यात झळकावले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय क्षण होता.

हिटमॅनची ही कामगिरी फार कमालीची ठरली. त्याने १५८ चेंडूत १२ चौकार आणि १६ विक्रमी षटकारांसह तब्बल २०९ धावा केल्या. त्याने वन-डे क्रिकेटमधील पहिल्या द्विशतकासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वन-डे धावा करण्याचा विक्रम केला.

रोहितच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने या खेळीतील १६ षटकारांसह एका वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. यावेळी त्याने शेन वॉटसनचा १५ षटकारांचा पूर्वीचा विक्रम मोडला. हा विक्रम २०१९ मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने मोडला. त्याने २०२९ मधील वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या १४८ धावांच्या खेळीत १७ षटकार ठोकले.

रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीच्या मदतीने भारताने ५० षटकांत ६ बाद ३८३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघानेही चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु,अखेर ५७ धावांनी त्यांना पराभव पत्कारावा लागला.

या मालिकेत रोहित शर्माने महत्वाचे योगदान दिले. कारण त्याने मालिकेत १२२ च्या सरासरीने ४९१ धावा (भारतासाठी सर्वाधिक धावा) केल्या होत्या. ज्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत ३-२ असा अविस्मरणीय विजय मिळवला.

Rohit sharma
IPL Retention 2025 : मोठ्या मनाचा मुंबईचा 'राजा'! Rohit Sharma ला मुंबई इंडियन्सने चौथे स्थान का दिले माहित्येय?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०० धावांच्या नाबाद खेळीसह वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने इंदोरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची स्पोटक खेळी केली. त्यानंतर रोहित शर्मा वन-डे क्रिकेटमध्ये २०० धावांचा टप्पा गाठणारा तिसरा फलंदाज ठरला.

आतापर्यंत तीन एकदिवसीय शतके झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज ठरला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक केल्यानंतर, कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूंत २६४ धावा केल्या, जी वन-डे मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने महत्त्वाचे तिसरे द्विशतकही झळकावले, जेथे तो २०८ धावांवर नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.