PAK vs BAN 1st Test: एकटा टायगर! बांगलादेशने पाकिस्तानला रडकुंडीला आणले; यजमान खेळपट्टीला दोष देऊ लागले

Pakistan vs Bangladesh 1st Test: पाकिस्तान संघाला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशकडून सडेतोड उत्तर मिळाले. मुश्फीकर रहिमच्या झंझावाती खेळीने पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
PAKvsBan
PAKvsBanesakal
Updated on

Pakistan vs Bangladesh 1st Test Live : पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर बांगलादेशने रडकुंडीला आणले आहे. पहिल्या डावात ६ बाद ४४८ ( डाव घोषित) धावा केल्यानंतर बांगलादेशला सहज रोखू असे त्यांना वाटले होते. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी त्यांना चोप दिला. सलामीवीर शादमान इस्लामचे शतक हुकले असले तरी त्याने संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण, मुश्फिकर रहिम ( Mushfiqur Rahim ) मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला आणि बांगलादेशला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानी खेळाडू आता खेळपट्टीला दोष देताना दिसत आहेत.

मोहम्मद रिझवानची फटकेबाजी...

पाकिस्तानने पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला. या कसोटीत पाकिस्तानने ११४ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर सौद शकील आणि रिझवान यांच्यात पाचव्या विकेटसाठी २४० धावांची भागीदारी झाली. शकीलने २६१ चेंडूंत नऊ चौकारांसह १४१ धावा केल्या, तर रिझवानने २३९ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १७१ धावांची खेळी केली.

PAKvsBan
Shikhar Dhawan Retirement: शिखर धवन मुलगा जोरावरच्या आठवणीने भावूक; म्हणाला, त्याला हे माहित...

बांगलादेशला सुरूवातीला धक्का...

४४८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ५३ धावांवर दोन धक्के बसले. सलामीवीर इस्लाम १८३ चेंडूंत १२ चौकारांसह ९३ धावांवर बाद झाला. त्याचे शतक हुकल्याचे दुःख बांगलादेशच्या खेळाडूंना होते. मोमिनुल हक आणि मुश्फीकर रहिम यांनी चौथ्या विकेटसाठी चांगला खेळ केली. मोमिनुल ५० धावांवर माघारी परतला. त्यानंतर शाकिब अल हसन ( १५) अपयशी ठरला. लिटन दास व मुश्फिकर यांनी ११९ धावांची भागीदारी केली.

लिटन दास ७८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५६ धावांवर बाद झाला. मुश्फिकरला मेहिदी हसनची साथ मिळाली. या दोघांनी संघाला ६ बाद ४९५ धावांपर्यंत पोहोचवले आणि पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. मुश्फिकर ३१४ चेंडूंत २० चौकार व १ षटकारांसह १७३ धावांवर नाबाद आहे, तर मेहिदी ५० धावांवर खेळतोय...

PAK vsBAN
PAK vsBANesakal
  • पाकिस्तानमध्ये कसोटीत १५० हून अधिक धावांची वैयक्तिक खेळी करणारा मुश्फिकर रहिम हा पहिला बांगलादेश फलंदाज ठरला आहे.

  • पाकिस्तानमध्ये कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही रहिमच्या नावावर आहे आणि त्याने जावेद ओमार ( ११९ , पेशावर, २००३) यांचा विक्रम मोडला.

  • पाकिस्तानविरुद्ध कसोटीत दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा बांगलादेशी फलंदाजाचा विक्रम रहिमने नावावर केला. तमिम इक्बाल ( २०६, खुल्ना, २०१५) हा अव्वल आहे.

  • रहिम व मेहिदी यांनी ७व्या विकेटसाठी १४६ हून अधिक धावा जोडल्या आहेत आणि ही या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.