PAK vs BAN : १३०३ दिवस झाले, पाकिस्तानला घरच्या मैदानावर जिंकता नाही आले!

Pakistan vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून पाकिस्तानविरुद्धची मालिका २-० अशी खिशात घातली. बांगलादेशचा हा कसोटी इतिहासातील तिसरा मालिका विजय आहे.
Bangladesh beat Pakistan
Bangladesh beat Pakistan esakal
Updated on

Bangladesh beat Pakistan in 2nd Test: बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानला विजयासाठी १८५ धावांचेच आव्हान ठेवता आले होते. ते बांगलादेशच्या फलंदाजांनी सहज पार केले आणि मालिका २-०ने जिंकली. पाकिस्तानला १३०३ दिवस घरच्या मैदानावर एकही कसोटी जिंकता आलेली नाही.

पाकिस्तानला दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर मालिकेत एकही कसोटी जिंकता आलेली नाही. यापूर्वी २०२२-२३ मध्ये इंग्लंडकडून त्यांची ३-० अशी हार झाली होती. पाकिस्तानला घरच्या मैदानावर ICC सदस्य असलेल्या सर्व दहा संघांकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

Bangladesh beat Pakistan in 2nd Tes
Bangladesh beat Pakistan in 2nd Tesesakal

पाकिस्तानला मागील दहा कसोटींमध्ये एकही ( ६ पराभव व ४ ड्रॉ) विजय मिळवता आलेला नाही. यापूर्वी १९६९ व १९७५ मध्ये त्यांना घरच्या मैदानावर ११ कसोटी सामन्यांत एकही विजय मिळवता आला नव्हता. या विक्रमात झिम्बाब्वे ( १४) व बांगलादेश ( २७) हे दोन संघ पुढे आहेत, ज्यांची पाकिस्तानपेक्षा खराब कामगिरी झालेली आहे.

Bangladesh beat Pakistan in 2nd Tes
Bangladesh beat Pakistan in 2nd Tesesakal

बांगलादेशचा हा प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील तिसरा कसोटी मालिका विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ( २) असा आणि २०२१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १-० ( १) असा विजय मिळवला होता.

बांगलादेशला परदेशात फक्त ८ कसोटी मालिका जिंकता आलेल्या आहेत. यापैकी वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे व पाकिस्तान यांच्याविरुद्ध प्रत्येकी २, तर श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येक १ विजय आहे.

Bangladesh beat Pakistan in 2nd Test
Bangladesh beat Pakistan in 2nd Testesakal

पहिल्या इनिंग्जमध्ये आघाडी घेतल्यानंतरही पराभूत होण्याची पाकिस्तानची ही चौथी वेळ आहे. २०००मध्ये १७ धावांची आघाडी घेऊनही कराची कसोटीत इंग्लंडकडून संघ हरला होता.

Bangladesh beat Pakistan in 2nd Test
Bangladesh beat Pakistan in 2nd Testesakal

शान मसूद याच्या नेतृत्वाखाली खेळताना पाकिस्तानने पहिले पाच कसोटी सामने गमावले आहेत. अशी खराब कामगिरी करणारा तो आठवा कर्णधार आहे. यापूर्वी खालेद मसूद ( १२), खालेद महमूद ( ९), मोहम्मद अर्शफुल ( ८) आणि नैमूर रहमान ( ५) यांच्यासह झिम्बाब्वेचा ग्रॅमी क्रीमर ( ६), न्यूझीलंडचा केन रुथरफोर्ड ( ५) आणि वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेट ( ५) यांनी नकोसा विक्रम नावावर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.