Banglaesh beat Pakistan in Test Series : बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरी पराभवाची चव चाखवली आणि कसोटी मालिका २-० अशी जिंकली. बांगलादेशने पहिली कसोटी १० विकेट्सने जिंकली आणि त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्सने बाजी मारली. बांगलादेशने प्रथमच कसोटी मालिकेत पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. यापूर्वी बांगलादेशने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज यांच्यावर कसोटी मालिका विजय मिळवला होता.
या मालिकेत मेहिदी हसन मिराज ( Mehidy Hasan Miraz) याने मालिकेत १० विकेट्स मिळवल्या आणि त्याला प्लेअर ऑफ दी सीरिजच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ''मी खूप आनंदी आहे. परदेशात मी पहिल्यांदाच मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकलाल आहे. त्यामुळे मी खूप खूश आहे. ८व्या क्रमांकावर फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. मी स्ट्राईक रोटेट करण्याचा आणि फलंदाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मुशी व लिटनसोबत चांगली भागिदारी केली,''असे मिराज सामन्यानंतर म्हणाला.
बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत १८५ धावांचे लक्ष्य ४ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या २७४ धावांच्या प्रत्युत्तरात त्यांनी लिटन दासच्या शतकाच्या जोरावर २६४ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव १७२ धावांवर गडगडला आणि बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवू शकला.
''मी फलंदाजीचाही आनंद लुटला... पाच विकेट्स घेतल्याने आनंद द्वीगुणित झाला. या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे आव्हानात्मक होते. पुढच्यावेळेस मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन," असेही तो म्हणाला.
मिराजने या विजयाचे श्रेय बांगलादेश संघ व्यवस्थापनाला दिले आणि त्याने त्याचे प्लेअर ऑफ दी पुरस्कार बांगलादेश आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांना समर्पित केला. तो म्हणाला,''याचे श्रेय संघ व्यवस्थापनला जाते. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि प्रचंड मेहनत घेतली. हा क्षण मी विसरणार नाही. मी परदेशात प्रथमच प्लेअर ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकला आहे.''
आमच्या देशात सध्या काय परिस्थिती आहे, याच तुम्हाला कल्पना आहेच. देश संकटाचा सामना करतोय आणि हा पुरस्कार मी आंदोलनात मृत्यु झालेल्यांना समर्पित करतो. त्यात एक रिक्षा चालक होता, जो जखमी झाला आणि त्यानंतर त्याचं निधन झाले. हा पुरस्कार मी त्याच्यासाठी गिफ्ट देऊ इच्छितो,'' असेही तो म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.