PAK vs BAN 2nd Test : ६१६ दिवस... Babar Azam च्या अर्धशतकाची प्रतीक्षा कायम, पाकिस्तान संघ पराभवाच्या छायेत

Babar Azam failed again : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान संघ दुसऱ्या सामन्यातही हरण्याच्या वाटेवर आहे. संघ अडचणीत असताना बाबर आजम पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.
Babar Azam
Babar Azamesakal
Updated on

Pakistan vs Bangladesh 2nd Test Babar Azam : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आजम पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो ११ धावांवर युवा गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर बाद झाला. ६१६ दिवस झाले बाबरला कसोटीत अर्धशतक झळकावता आलेले नाही. पहिल्या डावात त्याला ३१ धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान संघ अडचणीत असताना बाबर आज तरी खेळेल असे वाटले होते, परंतु चाहत्यांनी निराशा झाली.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील १९ व्या षटकात राणाच्या शॉर्ट लेंथ चेंडूवर बाबर फसला आणि स्लीपमध्ये उभ्या असलेल्या शादमन इल्सामच्या हाती झेल देऊन परतला. बाबरच्या विकेटने पाकिस्तानची अवस्था ५ बाद ६५ धावा अशी केली. बाबरने १८ चेंडूंत ११ धावा केल्या.

Babar Azam
पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये राडा! Shaheen Afridi अन् शान मसूद एकमेकांच्या अंगावर धावले, मोहम्मद रिझवानला चोपले?

पुढच्याच चेंडूवर राणाने मोहम्मद रिझवानची विकेट मिळवलीच होती, परंतु शादमनने झेल टाकला. याआधीच्या षटकात राणाने पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदला माघारी पाठवले. लिटन दासने सोपा झेल टिपला. मसून ३४ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. ३० षटकांत पाकिस्तानने ६ बाद ११७ धावा केल्या आहेत आणि लंच ब्रेकपर्यंत त्यांच्याकडे १२९ धावांची आघाडी आहे. कसोटीतील मागील १६ डावांत बाबरला १४,२४,२७, १३,२४, ३९,२१,१४,१, ४१,२६,२३,०,२२,३१,११ अशसी कामगिरी केली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावातत २७४ धावा केल्या. सईम आयूब ( ५८), शान मसूद ( ५७), सलमान आघा ( ५४) यांच्या अर्धशतकांनी पाकिस्तानला सावरले. बांगलादेशच्या मेहिदी हसन मिराजने ५ व तस्कीन अहमदने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने २६ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या, परंतु लिटन दासने १३८ धावा करून पाकिस्तानला हैराण केले. बांगलादेशने तिथून २६२ धावांपर्यंत मजल मारली आणि पाकिस्तानला मोठी आघाडी मिळवू दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.