PAK vs BAN, 2nd Test: पाकिस्तानच्या फलंदाजांची शरणागती; बांगलादेश दुसरा कसोटी सामनाही जिंकण्याच्या वाटेवर

India vs Bangladesh, 2nd Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघ सलग दुसऱ्या पराभवाच्या छायेत आहे. दुसऱ्या डावात त्यांची फलंदाजी कोलमडल्याचे दिसले.
Pakistan vs Bangladesh | 2nd Test
Pakistan vs Bangladesh | 2nd TestSakal
Updated on

Pakistan set target of 185 runs for Bangladesh: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात रावळपिंडी येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानचा दुसरा डाव ४६.४ षटकात १७२ धावांवर संपुष्टात आला. पण पहिल्या डावातील १२ धावांच्या आघाडीमुळे त्यांनी बांगलादेशसमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात सुरुवातीला पाकिस्तानने वर्चस्व राखले होते, परंतु बांगलादेशने केलेल्या पुनरागमनामुळे ते पुन्हा बॅकफूटवर पडले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १० विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर आता जर बांगलादेशने दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवला, तर ते पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकतील.

Pakistan vs Bangladesh | 2nd Test
PAK vs BAN 2nd Test : ६१६ दिवस... Babar Azam च्या अर्धशतकाची प्रतीक्षा कायम, पाकिस्तान संघ पराभवाच्या छायेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.