RCB ने पाकिस्तान क्रिकेट संघाची उडवली खिल्ली; हर्षा भोगलेंनी घेतली मजा

Pakistan vs Bangladesh: बांग्लादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्यांना ट्रोल केले जातेय...
Pakistan vs Bangladesh
Pakistan vs Bangladeshesakal
Updated on

Bangladesh beat Pakistan Test Series: बांग्लादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-० अशी पराभवाची चव चाखवली. दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही बांग्लादेशने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या मालिकेपूर्वी बांगलादेशला १२ कसोटी मालिकांमध्ये पाकिस्तानला हरवता आले नव्हते. इतकेच नव्हे तर बांगलादेश सर्व फॉरमॅटमधील पाकिस्तानात खेळलेल्या २० मालिकांमध्येही जिंकला नव्हता. पण, कसोटी मालिका जिंकून बांगलादेशने इतिहास रचला.

घरच्या मैदानावरील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर जगभरातून टीका होत आहेत. यात पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचाही समावेश आहे. याच संधीचा फायदा घेत भारतीयांनी ट्रोल केले आहे.

Pakistan vs Bangladesh
Rahul Dravid ला काम मिळालं! पुन्हा दिसणार मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; वाचा Inside Story

पाकिस्तानच्या या पराभवाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खिल्ली उडवली आहे. RCB ने भारतीय संघाचा फोटो पोस्ट करत म्हटले की," घरच्या मैदानावर जिंकणे इतके सोपे नाही. पण भारतीय संघासाठी ते अवघड नाही आणि भारतीय संघ या महिन्यात पुन्हा खेळण्यासाठी मैदानावरती उतरणार आहे."

समालोचक हर्षा भोगले म्हणाले,"मी एकदा म्हणालो होतो खेळाच्या लहान फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करतो, परंतु कसोटी क्रिकेट त्यांच्यासाठी जड आहे. पण, तो एवढा जड जाईल असे मला वाटले नव्हते."

पाकिस्तानविरूद्धच्या या दणदणीत विजयानंतर बांग्लादेश संघ १९ सप्टेंबर पासून २ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.