Bangladesh vs Pakistan 2nd Test: बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बांगलादेशने हा सामना १० विकेट्सने जिंकला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. पाकिस्तानविरुद्धचा बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि कर्णधार शान मसूद हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते, असे वृत्त आहे. पण, याला दुजोरा देणारे किंवा असं काही घडलं, याबाबत कोणीच भाष्य केलेले नाही.
रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या संघात वाद झालेले पाहायला मिळाले होते. बाबर आजमने सोपा झेल सोडल्याने कर्णधार शान मसूद संतापलेला दिसला. एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, त्यात जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी कर्णधार शान मसूदने खांद्यावर ठेवलेला हात झटकताना दिसला होता. त्यामुळेच ड्रेसिंग रुममधील वादाचे वृत्त खरंही असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शाहिन व मसूद यांच्यातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मोहम्मद रिझवानलाही या दोघांची चोप दिल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजन कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टसन यांनी संघातील खेळाडूंमध्ये एकात्मता नसल्याचे विधान केले होते.
दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावातत २७४ धावा केल्या. सईम आयूब ( ५८), शान मसूद ( ५७), सलमान आघा ( ५४) यांच्या अर्धशतकांनी पाकिस्तानला सावरले. बांगलादेशच्या मेहिदी हसन मिराजने ५ व तस्कीन अहमदने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने २६ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या, परंतु लिटन दासने १३८ धावा करून पाकिस्तानला हैराण केले. बांगलादेशने तिथून २६२ धावांपर्यंत मजल मारली आणि पाकिस्तानला मोठी आघाडी मिळवू दिली नाही. पाकिस्तानने दुसऱ्या डावात १० धावांवर दोन विकेट्स गमावल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.