PAK vs BAN 2nd Test Live : बांगलादेशने दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानचे वस्त्रहरण केले. बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय मिळवून इतिहास घडवला. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर यजमान पाकिस्तानचा संघ पुनरागमन करेल असे वाटले होते. पण, बांगलादेशने त्यांना डोकं वर काढण्याचीच संधी दिली नाही. बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवून पाकिस्तानात त्यांचा नागिण डान्स केला...
पहिल्या कसोटीत बांगलादेशने १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता आणि पाकिस्तानविरुद्ध हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय ठरला. दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात २७४ धावा केल्या. सईम आयूब ( ५८), शान मसूद ( ५७), सलमान आघा ( ५४) यांच्या अर्धशतकांनी पाकिस्तानला सावरले. बांगलादेशच्या मेहिदी हसन मिराजने ५ व तस्कीन अहमदने ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात बांगलादेशने २६ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या, परंतु लिटन दासने १३८ धावा करून पाकिस्तानला हैराण केले. बांगलादेशने तिथून २६२ धावांपर्यंत मजल मारली आणि पाकिस्तानला मोठी आघाडी मिळवू दिली नाही. दुसऱ्या डावात पाकिस्तानची गाडी १७२ धावांवर घसरली. मोहम्मद रिझवान ( ४३) व सलमान आघा ( नाबाद ४७) यांनी पाकिस्तानची लाज वाचवली.
बांगलादेशच्या हसन महमुद ( ५-४३) आणि नहिद राणा ( ४-४४) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. विजयासाठी १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जाकीर हसन आणि शदमान इस्लाम यांनी ५८ धावांची सलामी दिली. पाचव्या दिवशी या दोघांना माघारी पाठवण्यात पाकिस्तानला यश आले. पण, तोपर्यंत सामना हातातून निसटला होता. कर्णधार नजमूल होसेन शांतो ( ३८) आणि मोमिनूल हक ( ३४) यांनी ५७ धावांची भागीदारी केली. बांगलादेशला १५३ धावांवर चौथा धक्का बसला, परंतु विजयासाठी ३२ धावाच हव्या होत्या. बांगलादेश ६ विकेट्स राखून दुसरी कसोटी जिंकली. शाकिब अल हसन २१ आणि मुश्फिकर रहिम २२ धावांवर नाबाद राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.