PAK vs BAN: ऐ चल हात काढ! शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानी कर्णधाराचा हात खांद्यावरून झटकला, Video Viral

Pakistan vs Bangladesh 1st Test: बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. या सामन्यात पाकिस्तान संघातील वादही चव्हाट्यावर आलेले दिसले.
PAK vs BAN
PAK vs BANesakal
Updated on

Pakistan vs Bangladesh 1st Test: बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. बांगलादेशने १० विकेट्सने ही मॅच जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. बांगलादेशने प्रथमच कसोटीत पाकिस्तानला पराभूत करण्याचा पराक्रम केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

रावळपिंडी येथील कसोटीत पाकिस्तानच्या संघात वाद झालेले पाहायला मिळाले. बाबर आजमने सोपा झेल सोडल्याने कर्णधार शान मसूद संतापलेला दिसला. त्यानंतर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याला चेंडू फेकून मारला. त्यात आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी कर्णधार शान मसूदने खांद्यावर ठेवलेला हात झटकताना दिसतोय.

Viral Video मध्ये शान आणि शाहीन शेजारी उभे असल्याचे दिसत आहेत. शानने हर्डलमध्ये शाहीनच्या खांद्यावर हात ठेवला होता, परंतु शाहीनने तो अलगद बाजूला सरकवलेला दिसला.

शान आणि मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्यात ड्रेसिंग रुमबाहेर झालेल्या वादाच्या व्हिडीओनंतर शाहीनसोबतच्या व्हिडीओने संघातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

PAK vs BAN
PAK vs BAN: पाकिस्तानच्या कर्णधाराचा राग अनावर, ड्रेसिंग रुममध्ये कोचवरच भडकला? Video Viral

या सामन्यात मेहिदी सहन मिराझ व शाकिब अल हसन यांनी सात विकेट्स घेऊन बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मेहिदीने २१ धावांत ४, तर शाकिबने ४४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा दुसरार डाव १४६ धावांवर गडगडला. त्यानंतर ३० धावांचे माफक लक्ष्य बांगलादेशने ६.३ षटकांत पूर्ण केले. पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने १७३ आणि दुसऱ्या डावात ५१ धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.