PAK vs ENG 1st Test : ‘Root’ मजबूत! इंग्लंडच्या जो रूटने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; टॉफ फाईव्हमध्ये एकही भारतीय नाही

Pakistan vs England 1st Test Joe Root : पाकिस्तान-इंग्लंड कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय.. सपाट खेळपट्टीवर पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी शतक झळकावताना पहिल्या डावात ५५६ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दोन विकेट्स गमावल्या आहेत, परंतु जो रूट मैदानावर उभा आहे.
JOE Root
JOE Rootesakal
Updated on

Pakistan vs England 1st Test Joe Root Record : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने आपला फॉर्म कायम राखताना पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विक्रमी कामगिरी केली आहे. अब्दुल्लाह शफिक ( १०२), कर्णधार शान मसूद ( १५१) व सलमान आघा ( १०४) यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार व सलामीवीर ऑली पोप भोपळ्यावर माघारी परतला. पण, जो रूट व झॅक क्रॉली मैदानावर उभे राहिले. रूटने ३२ धावांचा टप्पा ओलांडताच मोठा विक्रम नोंदवला आणि असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला.

England vs Pakistan कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने ५४ धावांत ३२ धावांची खेळी करताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात ५००० धावांचा टप्पा त्याने ओलांडला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने ५९ सामन्यांत ५००५ धावा केल्या आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनच्या नावावर ३९०४ आणि तिसऱ्या क्रमांकावरील स्टीव्ह स्मिथच्या नावावर ३४८४ धावा आहेत. बेन स्टोक्स ( ३१०१) आणि बाबर आझम ( २७५५) हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे टॉप फाईव्हमध्ये भारताचा एकही फलंदाज नाही.

रूटला आणखी एक विक्रम या कसोटीत खुणावतोय... त्याने आणखी ३९ धावा केल्यास तो इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या एलिस्टर कूकला मागे टाकेल. शिवया सचिन तेंडुलकरच्या कॅलेंडर वर्षात कसोटीत सर्वाधिक धावांच्या विक्रमाच्याही तो जवळ पोहोचला आहे. रूटने २०२४ या कॅलेंडर वर्षात १००० धावा केल्या आहेत आणि ३३ वर्षीय फलंदाजाने कॅलेंडर वर्षात पाचवेला १०००+ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने सहावेळा हा पराक्रम केला आहे. पाचवेळा असा पराक्रम करून रूट ब्रायन लारा, मॅथ्यू हेडन, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि एलिस्टर कूक यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.