PAK vs ENG : Joe Root ची डबल सेन्च्युरी, हॅरी ब्रूकने केली पाकिस्तानची धुलाई; राहुल द्रविडचा विक्रम मोडला अन् वीरूशी केली बरोबरी

Pakistan vs England 1st Test : पहिल्या डावात ५५६ धावा उभ्या केल्यानंतर पाकिस्तानला आता मॅच आपलीच असं वाटलं असेल, परंतु जो रूट अन् हॅरी ब्रूक मैदानावर उभे राहिले आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली.
Joe Root double
Joe Root doubleesakal
Updated on

PAK vs ENG 1st Test Joe Root double century: इंग्लंडच्या फलंदाजांनी मुलतान कसोटीत दमदार प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले आहेत. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांचा डोंगर उभा केला, परंतु जो रूट व Harry Brook मैदानावर उभे राहिले. जो रूटने कसोटीतील सहावे द्विशतक झळकावताना अनेक विक्रमांची नोंद केली, तर ब्रूकही द्विशतकाच्या जवळ पोहोचला आहे. इंग्लंडने ११९ षटकांत ३ बाद ५८६ धावा करून आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानने अब्दुल्लाह शफिक ( १०२), कर्णधार शान मसूद ( १५१) व सलमान आघा ( १०४) यांच्या शतकांच्या जोरावर ५५६ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार व सलामीवीर ऑली पोप भोपळ्यावर माघारी परतला. पण, जो रूट व झॅक क्रॉली ( ७८) यांनी १०९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रूट व बेन डकेट ( ८४) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या. पण, रूट व ब्रूक ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि दोघांनी इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. जो रूट ३३२ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने २२४ धावांवर खेळतोय, तर हॅरी ब्रूक २२८ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारासह १८६ धावांवर नाबाद आहे.

Joe Root double
IND vs BAN 2nd T20I: हम 'सात'!भारतीय संघाने ट्वेंटी-२०त नोंदवला भारी रेकॉर्ड; पाकिस्तानच्या नाकावर मारली टिचकी
  • जो रूटने आजच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजारा धावांचा टप्पा ओलांडला आणि इतक्या धावा करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील १३ वा फलंदाज ठरला आहे. रूटने ४५८ इनिंग्जमध्ये २० हजारा धावांचा टप्पा ओलांडून रिकी पाँटिंग ( ४६४ इनिंग्ज), राहुल द्रविड ( ४९२), एबी डिव्हिलियर्स ( ४८३) व जॅक कॅलिस( ४९१) यांचा विक्रम मोडला.

  • घरच्या मैदानाबाहेर सर्वाधिक द्विशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूटने ग्रॅमी स्मिथशी ( ४) बरोबरी केली आहे. या विक्रमात डॉन ब्रॅडमन, वॅली हॅमोंड, ब्रायन लारा, कुमार संगकारा व युनिस खान ( प्रत्येकी ५ द्विशतकं) हे पुढे आहेत.

  • आशियात सर्वाधिक ३ द्विशतकं झळकावणारा जो रूट हा पहिला परदेशी फलंदाज आहे. रोहन कन्है, ब्रायन लारा, स्टीफन फ्लेमिंग, एबी डिव्हिलियर्स, ग्रॅमी स्मिथ व ब्रेंड मॅक्युलम ( प्रत्येकी २) यांना रूटने आज मागे सोडले.

जो रूट व हॅरी ब्रूक यांनी घरच्या मैदानाबाहेर ३०० हून अधिक धावांची भागीदारी केली आणि अशी कामगिरी करणारी ही तिसरी जोडी ठरली. डॉन ब्रॅडमन-विल पोन्सफोर्ड व हाशिम आमला-जॅक कॅलिस या दोन जोड्या आहेत.

भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे कसोटीत द्विशतक झळकावणारा जो रूट हा तिसरा फलंदाज आहे. त्याने २०२१ मध्ये गॅले येथे २२८ व २०२१ मध्येच चेन्नईत २१८ धावांची खेळी केली होती. वीरेंद्र सेहवाग ( ३०९ ( मुलतान, २००४), २०१ ( गॅले, २००८) आणि ३१९ ( चेन्नई, २००८)) आणि माहेला जयवर्धने यांनी असा पराक्रम केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.