Pakistan vs England 1st Test Multan: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. मुलतान येथे सुरू असलेल्या कसोटीत पाकिस्तानने सामन्यावर पकड घेतली आहे. चौथ्या षटकात गस एटकिन्सनने पाकिस्तानला धक्का दिला. सईम आयुब ( ४) स्वस्तात माघारी परतला. पण, त्यानंतर कर्णधार शान मसूद व अब्दुल्लाह शफिक यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200+ धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम नोंदवले.
१ बाद ८ धावा अशी अवस्था असताना कर्णधार मसूद मैदानावर आला आणि त्याने अब्दुल्लाहला सोबत घेऊन डावाला आकार दिला. शानने १०२ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि २०१५ नंतरचे हे पाकिस्तानी फलंदाजाचे कसोटीतील सर्वात कमी चेंडूंत झळकावलेले शतक ठरले. २०१९मध्ये बाबर आजमने रावळपिंडी कसोटीत श्रीलंकेविरुद्ध ११८ चेंडूंत शतक झळकावले होते. २०२३ मध्ये आघा सलमानने १२३ चेंडूंत ( वि. श्रीलंका, कोलंबो) आणि २०१५ मध्ये मोहम्मद हाफिजने १२३ चेंडूंत ( वि. बांगलादेशविरुद्ध, खुल्ना) यांनी अशी कसोटीत कमी चेंडूंत शतक झळकावले होते.
अब्दुल्लाह व मसूद यांनी दुसऱ्या विकेटसाठी दोनशेहून अधिक धावा जोडल्या आणि मुलतान क्रिकेट स्टेडियमवर कसोटीत दोनशेहून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पाकिस्तानी खेलाडूंची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग ( २००४ ) आणि ब्रायन लारा व ड्वेन ब्राव्हो ( २००६) यांनी अशी विक्रमी भागीदारी केली होती. मुलतानवर कसोटीत शतक झळकावणारा मसूद हा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी २००५ मध्य मार्कस ट्रेस्कॉटिच व २००६ मध्ये ब्रायन लारा यांनी हा पराक्रम केला होता.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत २०० हून अधिक धावांची भागीदारी करण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांना १९७१ नंतर २०२४ ची वाट पाहावी लागली. १९७१ मध्ये मुश्ताक मोहम्मद व झहीर अब्बास यांनी बर्मिंगहॅम कसोटीत २९१ धावांची भागीदारी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.