Pakistan vs England Test Series: पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना पराभूत झाल्यानंतर मात्र अफलातून पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. रावळपिंडी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानने तिसऱ्याच दिवशी ९ विकेट्सने विजय मिळवला.
दरम्यान पाकिस्तानने २०२१ नंतर पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे.
इंग्लंडला पाकिस्तानसमोर अवघे ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले होते. हे लक्ष्य पाकिस्तानने ३.१ षटकात एक विकेट गमावत पूर्ण केले. कर्णधार शान मसूदने आक्रमक खेळत ४ चौकार आणि एक षटकारासह ६ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. तसेच सईम आयुबने ८ धावांवर विकेट गमावली, तर अब्दुल्ला शफिकने ५ धावा केल्या.