PAK vs ENG 3rd Test: पाकिस्तानने अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडला २६७ धावांवर बाद केले. इंग्लंडचे ६ विकेट्स घेणाऱ्या साजिद खानचे यामध्ये महत्वाचे योगदान दिले. तर, आजचा दिवस साऊद शकीलने गाजवला. शकीलने पाकिस्तानचा डाव घसरत असताना शतकी खेळी केली व पाकिस्तानला सामन्यात आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानचा पहिला डाव ३४४ धावांवर संपुष्टात आला असून पाकिस्तानने सामन्यात ७७ धावांची आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानने काल शेवटच्या सत्रात आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली. पहिल्या दिवसाअंती पाकिस्तानने ३ विकेट्स गमावत ७३ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातील कर्णधार शान मसूद (२६) बाद झाला. पण साथीदार साऊद शकीलने पाकिसातनचा डाव एकहाती सावरला. एका बाजूने साऊद शकील हळूहळू पाकिस्तानच्या धावसंख्येत भर टाकत होता तर दुसऱ्या बाजूने पाकिस्तानी फलंदाज माघारी परतत होते. शकीलला रिझवानने २५ धावांची साथ दिली.
त्यानंतर शकीलने नोमान अलीला साथीला घेत पाकिस्तानची धावसंख्या २०० पार केली. दोघांनी ८व्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. दरम्यान साऊद शकीलने शतक ठोकले. नंतर नोमान अली ४५ धावांवर बाद झाला आणि भागिदारी तुटली.
कालच्या दिवशी गोलंदाजीमध्ये कमाल करणाऱ्या साजिद खानने आज फलंदाजी मध्ये कमाल करून दाखवली. साजिदने शकीलला साथ देत फटकेबाजी करायला सुरूवात करावी लागली आणि पाकिस्तानची धावसंख्या वेगाने वाढायला लागली.
पुढे अटकिंसनच्या गोलंदाजीवर शकील बाद झाला. शकिलने या डावात ५ चौकारांसह १३४ धावांचे योगदान दिले. तर साजिद खानने ४८ धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या व सामन्यात ७७ धावांची आघाडी घेतली.