PAK vs BAN: पाकिस्तान क्रिकेट संघाची नाचक्की; लाजीरवाण्या पराभवानंतर ICC न केली मोठी कारवाई

Pakistan vs Bangladesh 1st Test: बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. बांगलादेशने १० विकेट्सने ही मॅच जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.
PAK vs BAN
PAK vs BAN esakal
Updated on

PAK vs BAN 1st Test WTC Points: बांगलादेशकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाची आणखी नाचक्की झाली आहे. रावळपिंडी कसोटीत बांगलादेशने १० विकेट्स राखून यजमान पाकिस्तानला धुळ चारली होती. बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध कसोटीतील हा पहिलाच विजय ठरला आणि त्यानंतर पाकिस्तान संघावर टीका होताना दिसत आहे. अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.